घरदेश-विदेशभाजप-आरएसएस विरोधात लढायचं असेल तर पक्षात शिस्त आणि ऐक्याची गरज - सोनिया...

भाजप-आरएसएस विरोधात लढायचं असेल तर पक्षात शिस्त आणि ऐक्याची गरज – सोनिया गांधी

Subscribe

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी पक्षाचे सरचिटणीस, प्रदेश प्रभारी आणि प्रदेश काँग्रेस युनिटच्या प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी भाजप-आरएसएस विरोधात लढायचं असेल तर पक्षात शिस्त आणि ऐक्याची गरज आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या. तसंच, सभेच्या सुरुवातीलाच देशातील तरुण मुला-मुलींना त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी आंदोलनाची गरज आहे. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. जसं आपण मागील पिढ्यांपासून करत आलो आहोत, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

भाजप-आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध आपल्याला ताकदीनिशी लढायचं आहे. पूर्ण जिद्द आणि बांधिलकीने हे काम आपल्याला करायचं आहे आणि ही लढाई जिंकायची असेल तर त्यांचं खोटारडेपणा जनतेसमोर उघड करावा लागेल, असं सोनिया गांधी म्हणाल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) दररोज देशाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर महत्त्वाची आणि तपशीलवार विधाने जारी करते. पण ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत, पंचायत आणि जिल्हा पातळीवर पोहोचत नसल्याचा माझा अनुभव आहे. काही धोरणात्मक मुद्दे आहेत ज्यावर मला आमच्या राज्यस्तरीय नेत्यांमध्ये स्पष्टता आणि समन्वयाचा अभाव दिसत आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

- Advertisement -

सोनिया गांधी म्हणाल्या की, कोणत्याही राजकीय चळवळीसाठी युवा सदस्य सर्वात महत्त्वाचा असतो. सभासदत्व मोहीम घरोघरी जावी लागते. जिल्हा, गट, प्रभाग किंवा गावपातळीपर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करायची आहे. आपल्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील आवश्यक आहेत. त्यासाठी एआयसीसीकडून परिपत्रकही पाठवण्यात आलं आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -