घरदेश-विदेशसियाचीनमध्ये हिमस्खलन; दोन जवान शहीद

सियाचीनमध्ये हिमस्खलन; दोन जवान शहीद

Subscribe

दक्षिण सियाचीन ग्लेशिअरमध्ये सुमारे १८हजार फूट उंचीवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर हिमकडा कोसळून दोन जवान शहीद झाल्याचे समोर आले आहे.

दक्षिण सियाचीन ग्लेशिअरमध्ये भारतीय लष्काराच्या गस्ती पथकाजवळ शनिवारी हिमकडा कोसळल्याची दुदैवी घटना घडली. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले असून सुमारे १८ हजार फूटांवर ही दुर्घटना घडल्याचे कळते.

- Advertisement -

या दुर्घटनेत गस्ती पथकातील जवानांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने हेलिकॉप्टरच्या मदतीने काम सुरु केले आणि जवानांना बाहेर काढले. मात्र, यातील दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यापूर्वी १८ नोव्हेंबर रोजी देखील सियाचीन ग्लेशिअरमध्ये अशाच प्रकारे एक गस्ती पथक हिमस्खलनाच्या तावडीत सापडले होते. यामध्ये चार जवान शहीद झाले होते तर दोन पोर्टर्सचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत गस्ती पथकातील ८ जवान आणि पोर्टर बेपत्ता झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -