घरदेश-विदेशसोवा व्हायरस करतोय ग्राहकांचे बँक अकाऊंट मिनिटात रिकामी; SBI चा ग्राहकांचा इशारा

सोवा व्हायरस करतोय ग्राहकांचे बँक अकाऊंट मिनिटात रिकामी; SBI चा ग्राहकांचा इशारा

Subscribe

जर तुम्हीही मोबाईलमध्ये कोणताही अॅप डाऊनलोड करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सोवा मालवेअरमुळे तुमचं बँक अकाऊंट मिनिटात रिकामी होत असल्याचा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिला आहे. कोणत्याही अॅपच्या माध्यमातून हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये एन्ट्री घेतो आणि तुमच्या महत्त्वाच्या माहिती आणि असेट्स चोरत असल्याचे एसबीआयने सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना अशा व्हायरसपासून वाचण्यासाठी कॅनरा बँकेनेही खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. या सूचना खासकरून अँड्रॉईड फोनसाठी आहेत.

- Advertisement -

सोवा व्हायरस नेमका काय आहे?

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सोवा हा एक ट्रोजन मालवेअर आहे. जो एकदा का मोबाईलमध्ये शिरला तर तो बँकिंग अॅप्स वापरणाऱ्या ग्राहकांच्या पर्सनल डेटावर हल्ला करतो. तसेच ग्राहकांची मोबाईलमधील गुप्त माहिती चोरतो. ज्यावेळी तुम्ही बँकिंग अॅप वापरता त्यावेळी हे मालवेअर क्रेडेंशियल्स रेकॉर्ड करतो. या व्हायरसला मोबाईलमध्ये असलेले ओळखणे आणि बाहेर काढणे अवघड आहे.

सोवा व्हायरस नेमक काम काय?

सुरुवातीला एका फेक मेसेजच्या माध्यमातून हे व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतो. यानंतर हे ट्रोजन तुमच्या मोबाईलमधील सर्व अॅप्सची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवतो. नंतर हॅकर्स कमांड आणि कंट्रोलच्या माध्यमातून तुमच्या फोनमध्ये एक व्हायरस पाठवतो. त्याचसोबत एक यादीही पाठवली जाते ज्यामध्ये टार्गेट करण्यात येणाऱ्या अॅप्सची माहिती असते. जर या अॅप्सचा तुम्ही वापर केला तर व्हायरस त्याचा हा एक्सएमएल फाईलमध्ये स्टोअर करते. त्याचा अॅक्सेस हा हॅकर्सला सहज मिळतो.

- Advertisement -

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

सोवा व्हायरस एकदाका तुमच्या फोनमध्ये स्टोर झाला तर त्याला बाहेर काढणे कठीण होते. त्यामुळे या व्हायरसपासून वाचण्यासाठी खबरदारी घेणं गरजेचे आहे. सुरक्षेची खात्री असल्याशिवाय तुम्ही कोणतेही अॅप डाऊनलोड करू नका. अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू वाचा. तसेच अॅप डाऊनलोड करताना तुम्ही कोणत्या गोष्टींना परवानगी देता याची खात्री करा.


गरबा खेळताय सावधान! चार दिवसांत सहा जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -