भारतीयांच्या आर्युमानात ‘इतक्या’ वर्षांची वाढ

SRS Abridges Life Tables reports that Indian life expectancy has increased by two years

भारतीयांचे आर्युमान दोन वर्षांने वाढले आहे. भारतीयांचे सरासरी वय हे 69.7 वर्ष असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आले आहे. 2015 ते 2019 या काळात भारतीयांच्या वयात वाढ झाल्याचा अहवाल समोर आला आहे. भारतीयांच्या आर्युमानात दोन वर्षांची वाढ होण्यासाठी जवळपास 10 वर्ष लागली आहेत. पाच वर्षांखालील मुलांचे मृत्यू आणि जन्मावेळी होणारे मृत्यू ही आर्युमान संथ गतीने वाढण्यामागील कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या दोन प्रश्नांवर काम झाल्यास भारतीयांचे आयुष्य वेगाने वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतीयांचे आयुर्मान वाढले असले, तरी हे सरासरी जागतिक आर्युमानापेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. जगाचे सरासरी आर्युमान 72.6 इतके आहे. तर भारतीयांचे सरासरी आर्युमान 69.9 एवढे आहे.

जन्मवेळी अर्भकाचा मृत्यू होणे किंवा 5 वर्ष वयाच्या आत मृत्यू होण्याचे प्रमाण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक आहे. 45 वर्षात भारतीयांचे आर्युमान 20 वर्षांनी वाढले असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. 1970-75 मध्ये जन्मावेळी असलेले सरासरी आयुर्मान 49.7 वर्ष होते. ते आता 69.7 इतके झाले आहे. एसआरएस एब्रिड्ज लाईफ टेबल्स 2015-2019 च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

जन्मवेळी अर्भकाचा मृत्यू होणे, किंवा पाच वर्ष वयाच्या आत मृत्यू होण्याचे प्रमाण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक आहे. गेल्या 45 वर्षात भारतीयांचे आर्युमान 20 वर्षांनी वाढले असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. 1970-75 मध्ये जन्मावेळी असलेले सरासरी आर्युमान हे 49.7 वर्ष इतके होते. ते आता 69.7 वर्ष इतके झाले आहे. एसआरएस एब्रिड्ज लाईफ टेबल्स 2015-2019च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.