पंतप्रधान मोदींचा देहू दौरा; मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील सुरक्षेच्या कारणास्तव देहूतील जगतगुरु संत तुकाराम महाराजांचं मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता. मात्र सोशल मीडियावरील तीव्र प्रतिक्रियांनंतर हे मंदिर एकचं दिवस म्हणजे 14 जून रोजी भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.

pm narendra modi visit dehu high alert in maharashtra nakabandi in mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे 14 जून रोजी पुण्यातील देहू दौऱ्यावर येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा पथकाच्या सुचनेप्रमाणे मुंबईसह राज्यात हाय अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईतही पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. यामुळे मुंबईत रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी पोलिसांची गस्ती वाढवण्यात आली आहे. याशिवाय मुंबईत दाखल होणाऱ्या वाहनांची देखील कसून चौकशी सुरु आहे. संशयित व्यक्ती आणि गाड्यांची पोलीस तपासणी करत आहेत. रस्त्त्यावरून मध्यरात्री धावणाऱ्या वाहनांना कुठे प्रवास केला जाणार आहे याची माहिती घेतली जात आहे.

नरेंद्र मोदी येणार देहू दौऱ्यावर

पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रातील दौऱ्यादरम्यान कोणताही घातपात आणि अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी गस्ती वाढवण्यात आली असून अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. दुचाकी, चारचाकी, रिक्षा, टेम्पोसह मोठ्या वाहकांना थांबवून चौकशी केली जात आहे. तर मुंबईत दाखल झालेल्या वाहनांना प्रवासाचे कारण काय याची माहिती घेतली जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रात दोन दिवसांचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक शहरांतील रस्त्यांवर पोलिसांची गस्ती असून असून नाकाबंदी करत तपासणी होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण होणार आहे. देहू संस्थानने मार्चमध्ये स्वत: मोदींची दिल्लीत भेट घेत या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होतो. या आमंत्रणानंतर मोदी आता 14 जूनचा देहूमध्ये उपस्थित राहणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये येणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील सुरक्षेच्या कारणास्तव देहूतील जगतगुरु संत तुकाराम महाराजांचं मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता. मात्र भक्तांचा आणि सोशल मीडियावरील तीव्र प्रतिक्रियांनंतर हे मंदिर एकचं दिवस म्हणजे 14 जून रोजी भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.


Nupur Sharma Controversy : कुवेत सरकराचा मोठा निर्णय, आंदोलक परदेशी नागरिकांना करणार हद्दपार