घरमनोरंजननयनताराने घेतला लग्नानंतर चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन्स न करण्याचा निर्णय

नयनताराने घेतला लग्नानंतर चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन्स न करण्याचा निर्णय

Subscribe

नयनताराने आता चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन्स न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लग्नानंतर नयनतारा आपल्या पतीसोबत काही काळ घालवणार असून ती,चित्रपटक्षेत्रातून ब्रेक घेणार आहे

साउथ चित्रपटसृष्टीची मनमोहक अभिनेत्री नयनतारा ९ जून रोजी विग्नेश शिवन सोबत विवाहबद्ध झाली. ६ वर्षाच्या प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्न केले. नयनतारा सध्या तिचे वैवाहिक आयुष्य छान इन्जॉय करत आहे, मात्र याचं दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार नयनताराने लग्नानंतर आपल्या करिअरबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

नयनताराने घेतला मोठा निर्णय
सूत्रांच्या माहितीनुसार, नयनताराने आता चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन्स न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लग्नानंतर नयनतारा आपल्या पतीसोबत काही काळ घालवणार असून ती,चित्रपटक्षेत्रातून ब्रेक घेणार आहे. तसेच या ब्रेकनंतर परत आल्यानंतर नयनतारा चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन्स करणार नाही. मात्र अजून याबाबत नयनताराने स्वतः काही कंफर्मेशन दिलेले नाही.

- Advertisement -

थाटात पार पडले लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

- Advertisement -

हा विवाहसोहळा चेन्नई येथील महाबलिपुरममधील एका रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. या स्टार कपलच्या विवाह सोहळ्यात टॉलिवूडसह बॉलिवूड कलाकार ही सहभागी झाले होते. नयनताराच्या लग्नात शाहरूख शिवाय रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, सूर्या, कार्ति, विजय सेतुपति आणि सामंथा रुथ प्रभु यांसारखे अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

6 वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये होते नयनतार आणि विग्नेश
चित्रपटसृष्टीशी जोडलेले असल्याने या दोघांची लव स्टोरी फार चर्चेत असते. या दोघांची पहिली भेट एका सेट वर झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन विग्नेशने केले होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. मैत्री झाली आणि त्याचंच रूपांतर प्रेमात झाले. 6 वर्ष एकत्र राहिल्यानंतर नयनतारा आणि विग्नेशने 25 मार्च 2021 रोजी साखरपुडा केला.

शाहरूखसोबत ‘जवान’ चित्रपटात दिसणार नयनतारा
येत्या काळात नयनतारा शाहरूख खानसोबत ‘जवान’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच येत्या १७ जून रोजी नयनतारा ‘O2’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

 


हेही वाचा :श्रिया पिळगांवकर, भुवन बमसोबत दिसणार ‘दगडू’, प्रथमेश परबची ओटीटीवर एन्ट्री

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -