घरदेश-विदेशलाच म्हणून दोन अभिनेत्रींची मागणी करणारा 'तो' मंत्री कोण?; स्वामींच्या ट्विटने खळबळ

लाच म्हणून दोन अभिनेत्रींची मागणी करणारा ‘तो’ मंत्री कोण?; स्वामींच्या ट्विटने खळबळ

Subscribe

सुब्रमण्यम स्वामी यांनी या ट्विटमध्ये मात्र त्या मंत्र्याचे नाव उघड केले नाही. स्वामींच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असून धक्का बसला आहे.

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाच म्हणून बॉलिवूडमधल्या दोन अभिनेत्रींच्या मागण्या करणाऱ्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करता येईल? यावर संशोधन करत असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत कोणाला काही माहिती असेल तर सुचवा असे देखील आवाहन केले आहे.

- Advertisement -

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘मी सध्या लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचा अभ्यास करत आहे. एखाद्या मंत्र्याने प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींची मागणी केली होती. या मंत्र्यावर कोणत्या कायद्यानुसार कारवाई करता येईल? याचा अभ्यास सध्या मी करत आहे. याबात कोणाच्या काही सूचना असतील तर मला कळवा. मी संध्या यावर संशोधन करत असून त्यामध्ये मला याचा उपयोग होईल.’

सुब्रमण्यम स्वामी यांनी या ट्विटमध्ये मात्र त्या मंत्र्याचे नाव उघड केले नाही. स्वामींच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असून धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील दोन अभिनेत्री असल्यामुळे या ट्विटमुळे बॉलिवूड विश्वात देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -