घरताज्या घडामोडीसुदानमध्ये लष्करी दलांतील संघर्षात 200 नागरिकांचा मृत्यू तर, 1800 जखमी

सुदानमध्ये लष्करी दलांतील संघर्षात 200 नागरिकांचा मृत्यू तर, 1800 जखमी

Subscribe

निमलष्करी (आरएसएफ) आणि लष्करी दलांमध्ये झालेल्या संघर्षात सुदानमध्ये तब्बल 200 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1800 लोक जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. लष्करी दल आणि निमलष्करी दल यांचं विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून सुदानमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

निमलष्करी (आरएसएफ) आणि लष्करी दलांमध्ये झालेल्या संघर्षात सुदानमध्ये तब्बल 200 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1800 लोक जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. लष्करी दल आणि निमलष्करी दल यांचं विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून सुदानमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. संघर्षामुळे रुग्णालयांचे नुकसान झाले आहे. यासोबतच वैद्यकीय आणि अन्न पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. (sudan 200 killed 1800 injured so far in conflict between army and paramilitary vvp96)

हिंसाचारावेळी हवाई हल्ले आणि जोरदार गोळीबार होताना दिसत आहे. हा हिंसाचार सशस्त्र सेना कमांडर अब्देल फताह अल-बुरहान (Abdel Fattah al-Burhan) आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF), जनरल मोहम्मद हमदान डॅगलो (Mohamed Hamdan Daglo) यांच्यातील शक्ती संघर्षाचा एक भाग आहे. आठवडाभर चाललेल्या या सत्तासंघर्षाने शनिवारी प्राणघातक हिंसाचाराचे रूप धारण केले.

- Advertisement -

या युद्धामुळे पन्नास लाख लोकांनी सुदानची राजधानी खार्तुम सोडले आहे. तसेच, अनेक परदेशी नागरिक वीज आणि पाण्याविना घरात अडकून पडले आहेत. या युद्धामुळे वैद्यकीय सेवाही विस्कळीत झाली आहे. तर 12 हून अधिक रुग्णालयाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे जखमी नागरिकांचाही जीव धोक्यात आहे.

संघर्षाचे कारण काय?

- Advertisement -

सुदानचे सैन्यप्रमुख जनरल अब्देल-फताह बुऱ्हान आणि आरएसएफचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दागालो हे दोघेही पूर्वाश्रमीचे सहकारी आहेत. सुदानमध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये दोघांनी एकत्रितपणे लष्करी बंडाद्वारे तेथील अल्पकालीन लोकशाही उलथवून सत्ता ताब्यात घेतली होती. मात्र, आरएसएफच्या सैन्यामध्ये विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाला आहे. आपण वाटाघाटी करायला तयार नाही असे दोघांनीही स्पष्ट केले आहे. त्याऐवजी ते एकमेकांना शरण येण्याची मागणी करत आहेत.

भारतीय दुतावासाकडून आवाहन

या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुदानमधील भारतीयांना खबरदारी घेण्याचे आवाहन भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे. सुदानमध्ये 4000 भारतीय असून, त्यापैकी 1200 भारतीय अनेक वर्षांपासून तेथे स्थायिक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी झालेल्या गोळीबारात अल्बर्ट या केरळी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. अल्बर्ट यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी केंद्र सरकारने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1800-11-8797 (टोल फ्री), +91-11-23012113, +91-11-23014104, +91-11-23017905, मोबाइल +91-9968291988 आणि ईमेल [email protected] या क्रमांक आणि इमेलचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – पाटणातील तेल गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -