घरदेश-विदेशपाकिस्तानात 'ही' महिला बनली पहिली हिंदू न्यायाधीश

पाकिस्तानात ‘ही’ महिला बनली पहिली हिंदू न्यायाधीश

Subscribe

पाकिस्तान न्यायव्यवस्थेत प्रथमच हिंदू महिला न्यायाधीश झाली आहे. सुमन कुमारी असे या महिलेचे नाव आहे. पाकिस्तान न्यायव्यवस्थेतील हा एक मोठा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानाच्या न्यायव्यस्थेवर नेहेमीच जगाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात. पाकिस्तान न्यायव्यवस्था तेथील लष्कराच्या ताब्यात असल्याचे आरोपही अमेरिका आणि इतर देशांकडून लावल्या गेले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात यावर अनेकदा पाकिस्तानवर टीका करण्यात आली आहे. अशामध्येच पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेत एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या महितीनुसार पाकिस्तानात पहिल्यांदाच एका हिंदू महिलेला न्यायाधिश पदावर नियुक्त करण्यात आले आहे. सुमन कुमारी  असे या महिलेचे नाव आहे. सुमन यांना सिविल न्यायाधिश म्हणून नेमण्यात आले आहे. सुमन या कम्बर शहादकोट परिसरातून आहेत त्यांची नियुक्ती याच जिह्ल्यातील न्यायालयात करण्यात आली आहे. सुमनने लॉ चे शिक्षण हैद्राबाद येथून घेतले होते. कराची येथील सजाबिस्ट विद्यापीठातून त्यांनी लॉमध्ये मास्टरी चे शिक्षण घेतले.

- Advertisement -

सुनिता लता मंगेशकर यांची फॅन

सुमनचे वडिल नैत्र चिकिस्तक आहेत, मोठी बहिण सॉफ्टव्हेअर इंजिनर आणि दुसरी बहिण चार्टर्ड अकाउंटण्ट आहे. सुमन जेष्ठ गायीका लता मंगेशकर आणि आतिफ असलम यांची फॅन आहे. पाकिस्तानात नेमण्यात आलेल्या त्या पहिल्या महिला न्यायाधिश आहेत. यापूर्वीही राणा भगवानदास यांना पहिले हिंदू न्यायाधिश बनवण्याची संधी मिळाली आहे. भगवानदास यांनी २००५ ते २००७ दरम्यान न्यायाधिश पद भुषवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -