घरमहाराष्ट्रदिवाळी निमित्ताने सरकारकडून बोनस : साखरेचा भाव कमी होणार

दिवाळी निमित्ताने सरकारकडून बोनस : साखरेचा भाव कमी होणार

Subscribe

दिवाळी निमित्ताने साखरेचा भाव कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दिवाळीमध्ये गोड पदार्थ बनवण्याची रित आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साखर वापरली जाते. साखरची मागणी वाढली की किंमतही वाढण्याची भीती असते. परंतु, या दिवाळीत राज्य सरकारने साखररेचा दर कमी करण्याचे ठरवेले आहे. सराकरकडून हा दिवाळीचा बोनस म्हटला जावू शकतो. त्यामुळे यंदाची दिवाळी आता नक्कीच गोड जाणार आहे. या दिवाळीला साखरेचा भाव कमी होणार असून रेशनकार्डवर अवलंबून असलेल्यांना जादाची साखर मिळणार आहे. रेशनकार्डवर एक किलो साखर आणि दोन किलो डाळ जादा मिळणार आहे. त्याचबोरबर आयोडीन युक्त मीठ देखील मिळणार आहे.

काय असणार दर ?

या दिवाळीला साखरेचा दर प्रतिकिलो फक्त २० रुपये होणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. शिवाय, सणासुदीच्या दिवशी कुठल्याही प्रकारची भेसळ होऊ नये किंवा हि भेसळ रोखता यावी यासाठी विविध ठिकाणी भरारी पथक नेमले जाणार आहे. हे पथक त्यासंदर्भात तपासणी करणार असल्याचीही माहिती गिरीश बापट यांनी दिली.

- Advertisement -

हेही पाहा – साखर उद्योगासाठी ४५०० कोटींचे पॅकेज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -