घरताज्या घडामोडीपूंछमधील हल्ल्यानंतर पाकला सर्जिकल स्ट्राइकची भीती, परराष्ट्रमंत्री भारतात येणार

पूंछमधील हल्ल्यानंतर पाकला सर्जिकल स्ट्राइकची भीती, परराष्ट्रमंत्री भारतात येणार

Subscribe

पूंछमधील हल्ल्यानंतर पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राइकची भीती व्यक्त केली आहे. याबाबत भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी वक्तव्य केलं आहे. २० एप्रिल रोजी पूंछमध्ये भारतीय जवानांवर हल्ला झाला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या भीतीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय, असे बासीत म्हणाले.

पूंछमधील हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तराच्या हल्ल्याची भीती पाकला सतावू लागली आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. बासीत यांनी यूट्यूब चॅनलवर टाकलेल्या व्हिडीओत हा मुद्दा मांडला आहे. पाकमधील लोकं भारताकडून आणखी एक सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइकबद्दल बोलत आहेत. तथापि, मला वाटत नाही का, भारताकडून आता असे करण्यात येईल. कारण यावर्षी एससीओ बैठक आणि जी-२० चे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहेत. जोपर्यंत त्यांच्याकडे अध्यक्षपद आहे. तोपर्यंत भारत असे पाऊल उचलणार नाही. परंतु पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो एससीओच्या बैठकीसाठी भारतात येणार आहेत.

- Advertisement -

भारत पुढील वर्षी निवडणुकांच्या वेळी पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करू शकतो. भारतातील निवडणुकांपूर्वी हे होऊ शकते. बासित यांनी पूंछमधील दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करण्याचाही प्रयत्न केला, ज्यात ५ लष्करी जवान शहीद झाले.

२९ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात ११ भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने सीमा ओलांडून पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून ५० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. तसेच पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४६ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राइक करून बालाकोट येथील दहशतवादी तळ नष्ट करून ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

- Advertisement -

अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे ५ जवान हुतात्मा झाल्याने रमजान ईदसह इफ्तार पार्टी साजरी न करण्याचा निर्णय घेत जम्मू-काश्मीरमधील पूंछमधील संगियोते गावाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून दहशतवाद्यांना आपल्या कृतीतून उत्तर देत उत्तम माणुसकीचे दर्शन यामार्फत घडवल्याने या गावकर्‍यांचे सर्वत्र गोडवे गायले जात आहेत.


हेही वाचा : पूँछमधील गावकर्‍यांनी घडवले उत्तम माणुसकीचे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -