Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Surya Grahan 2021: यंदाच्या वर्षातील पहिले सूर्य ग्रहण १० जून रोजी, जाणून...

Surya Grahan 2021: यंदाच्या वर्षातील पहिले सूर्य ग्रहण १० जून रोजी, जाणून घ्या, ग्रहणाचा कालावधी

Related Story

- Advertisement -

यंदाच्या २०२१ या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण १० जून रोजी दिसणार आहे. चंद्रग्रहणानंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच १० जून रोजी हे ग्रहण अमावास्येला दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक काळालाही महत्त्व नाही. हे सूर्यग्रहण फक्त खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातूनच विशेष असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० जून रोजी दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी हे सूर्यग्रहण दिसणार आहे. आणि ते संध्याकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी संपणार आहे. हे आशिया, युरोप, उत्तर कॅनडा, उत्तर अमेरिका, ग्रीनलँड आणि रशियामध्ये दिसणार आहे. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

यावर्षी दोन सूर्यग्रहण दिसणार आहे. पहिले सूर्यग्रहण १० जून रोजी तर नंतरचे दुसरे सूर्यग्रहण ४ डिसेंबर रोजी दिसणार आहे. ४ डिसेंबर रोजी दिसणाऱ्या सूर्यग्रहणाचा परिणामही भारतात दिसून येणार नाही, तर त्याचा परिणाम अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अटलांटिकामध्येही दिसून येणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतात सूर्यग्रहण नसल्यामुळे सुतक म्हणजेच वेध कालावधीही वैध ठरणार नाही. गेल्या वर्षीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती जेव्हा पंधरा दिवसांत दोन ग्रहण दिसले होते.

- Advertisement -

२०२१ चे पहिले चंद्रग्रहण २६ मे रोजी दिसले होते. हे ग्रहण दुपारी २.१७ वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी ७.१९ वाजता संपले होते. हे ग्रहण देखील त्यावेळी भारतात दिसले नव्हते. हे वर्षाचे पहिले चंद्रग्रहण जगातील बर्‍याच भागात दिसले होते. तसेच वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर २०२१ रोजी दिसणार आहे. या चंद्र ग्रहणाला उपछाया ग्रहण मानले जात आहे. चंद्रग्रहणाचा आंशिक परिणाम भारतासह जगातील बर्‍याच देशांमध्ये दिसून येणार आहे. जेव्हा पृथ्वी पूर्णपणे चंद्र आणि सूर्यामध्ये येते, तेव्हा या अवस्थेस चंद्रग्रहण संबोधले जाते.

- Advertisement -