घरदेश-विदेश३० मे रोजी शपथविधी?

३० मे रोजी शपथविधी?

Subscribe

येत्या ३० मे रोजी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मोदी २८ मे रोजी आपला मतदार संघ वाराणसीत जाऊन तेथील जनतेचे आभार मानणार आहेत. त्यानंतर २९ मे रोजी गुजरातमधील आपल्या घरी जावून आईचे आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर ३० मे रोजी ते पंतप्रधानपदाची शपथ घेतली, असे सुत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात विराट जनादेश असलेले राष्ट्र प्रमुख ठरले आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखाली एकट्या भाजपाने बहुमताचा टप्पा अगदी सहज ओलांडला. पाच वर्ष सत्तेत असूनही भाजपाच्या जागांमध्ये वाढ झाली. भाजपा त्रिशतक गाठत असताना एनडीएने साडे तीनशेच्या टप्पा ओलांडला. त्यामुळे आता जगाचा विचार केल्यास, मोदी हे सर्वात तगडा जनादेश पाठिशी असलेले राष्ट्र प्रमुख आहेत.

- Advertisement -

सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे ३ जूनच्या आधी सतरावी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. त्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रीमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. तसेच तिन्ही निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना भेटून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची यादी त्यांच्याकडे सोपवणार आहेत. त्यानंतरच नव्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे.

सतरावी लोकसभा ३ जूनच्या अगोदर अस्तित्वात येणे आवश्यक असल्यामुळे येत्या ३० मे रोजी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी ते आपला मतदार संघ वाराणसीत जाणार आहेत. तेथे रोड-शो करत मोदी वाराणसीच्या नागरिकांचे आभार मानणार आहेत. त्यानंतर ते गुजरातमधील घरी जाऊन आपल्या आईचा आशीर्वाद घेणार आहेत. आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांचा नवी दिल्लीत शपथ विधी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -