घरताज्या घडामोडीतैवानमध्ये भीषण रेल्वे अपघात: ३६ प्रवाशांचा मृत्यू!

तैवानमध्ये भीषण रेल्वे अपघात: ३६ प्रवाशांचा मृत्यू!

Subscribe

गेल्या ४० वर्षांतील सर्वात भीषण रेल्वे अपघात तैवानमध्ये झाला आहे. या भीषण अपघातामध्ये ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ७२ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आहे. याबाबतची वृत्त रॉयटर्सने दिले आहे. या रेल्वेमध्ये जवळपास ३५० प्रवासी होते, अशी माहिती अग्निशमन दलाने सांगितले आहे. सध्या अजूनही अपघातग्रस्त रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे बचावकार्य सुरू आहे.

- Advertisement -

कसा झाला हा भीषण अपघात?

हा अपघात ट्रकला धडक दिल्यानंतर बोगद्यामध्ये रेल्वे रुळावरुन घसरून झाला. ताइतुंच्या दिशेने रेल्वे जात असताना हा भीषण अपघात घडला. वीकेण्ड असल्यामुळे रेल्वेमध्ये पर्यटकांची गर्दी जास्त होती. रेल्वे पूर्ण भरलेली होती. माहितीनुसार, रेल्वेत ३५० प्रवासी प्रवास करत होते. बचावकार्यदरम्यान पहिल्या चार डब्यातून ८० ते १०० प्रवाशांची सुटका करण्यात आली. पण अजूनही मागच्या चार डब्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, योग्य पद्धतीने ट्रक पार्क केला नव्हता, त्यामुळे ट्रक रेल्वेच्या मार्गात आला होता. या भीषण अपघातामध्ये रेल्वेचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अग्निशमन दलाकडून या घटनेचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेमध्ये मृत्यूची संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

तैवानमध्ये टॉम्ब स्वीपिंग फेस्टिव्हल होणार आहे. त्यामुळे सध्या सुट्टा आहेत. सुट्टीच्या काळ असल्यामुळे रस्त्यांपासून ते रेल्वेपर्यंत प्रवाशांची तुफान गर्दी आहे. या सुट्टीच्या काळात हा भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे सध्या तैवानमध्ये एकच खळबळ माजली आहे.

पाहा घटनास्थळावरील व्हिडिओ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -