घरताज्या घडामोडीताजमहाल सोडून आग्र्यातील सर्व ऐतिहासिक स्थळांवर रोषणाई , काय आहे नेमके कारण...

ताजमहाल सोडून आग्र्यातील सर्व ऐतिहासिक स्थळांवर रोषणाई , काय आहे नेमके कारण ?

Subscribe

सरकारी इमारती आणि स्मारकांवरही तिरंग्याची रोषणाई केली जात आहे. पण देशाचा अभिमान असलेल्या आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालवर मात्र ही रोषणाई दिसत नाहीये.

नवी दिल्ली-भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याने संपूर्ण देश सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान राबवण्याचे आवाहन जनतेला केले आहे. सर्वच सरकारी इमारती आणि स्मारकांवरही तिरंग्याची रोषणाई केली जात आहे. पण देशाचा अभिमान असलेल्या आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालवर मात्र ही रोषणाई दिसत नाहीये. यामुळे असे का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.

पण त्याआधी हे माहित करून घेणे आवश्यक आहे की ७७ वर्षांपूर्वी भारताचा पहीले स्मारक म्हणून ताज महालला रोषणाई केली जायची. एवढेच नाही तर ताजमहालमध्ये खास उत्सवाचेही आयोजन केले जायचे. २० मार्च १९९७ रोजीही ताजमहालमध्ये पियानोवादनाच्या एका भव्य कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने ताजमहालला रोषणाई करण्यात आली. पण २१ मार्च रोजी ताजमहालमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात लाखो मृत किडे आढळले. या घटनेने देशात खळबळ उडाली. त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या रासायनिक विभागातर्फे तपासणी करण्यात आली. त्यात रोषणाईच्या अतिप्रखर किरणांमुळे किडे मृत झाल्याचे आणि ताजमहलच्या पांढऱ्याशु्भ्र संगमरवरी भिंती आणि लाद्यांवर, छतावर त्यांचे अवशेष चिकटून राहील्याने त्याचे डाग उमटल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून ताजमहालवर रोषणाई करण्यास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने बंदी घातली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -