घरदेश-विदेशAssembly Election 2021: तमिळनाडूत वर्षाला ६ सिलेंडर फ्री, एकाला सरकारी नोकरी तर...

Assembly Election 2021: तमिळनाडूत वर्षाला ६ सिलेंडर फ्री, एकाला सरकारी नोकरी तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज माफ

Subscribe

तमिळनाडूत अण्णाद्रमुकचा जाहीरनामा प्रसिद्ध; मतदारांवर आश्वासनांचा वर्षाव

येत्या काही दिवसांत तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम या चार राज्यांसह पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक राज्यातील उमेदवारांच्या नावांच्या घोषणेसह त्या-त्या राज्यातील पक्ष आपले जाहीरनामे प्रसिद्ध करण्याच्या तयारीला लागले आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. यादरम्यान, तामिळनाडूत सध्या सत्तेत असलेल्या अण्णाद्रमुक (All India Anna Dravida Munnetra Kazhagam) पक्षानेही आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना आश्वासनांना वर्षाव केल्याचे दिसले. अण्णाद्रमुकने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेक आश्वासने मतदारांना दिली आहेत. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ६ सिलेंडर विनामुल्य देणार असून वृद्धांसह जेष्ठ मंडळींना देण्यात येणारी वृद्धांची पेन्शन दुप्पट करण्याबरोबरच मातृत्व रजेतही वाढ करणार असल्याचे आश्वासनं तामिळनाडूमध्ये असणाऱ्या विरोधी पक्ष अण्णाद्रमुकने दिले आहेत.

असा आहे तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्षाचा जाहीरनामा

  • प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ६ सिलेंडर मोफत
  • कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी
  • विद्यार्थ्यांनी घेतलेले शैक्षणिक कर्ज माफ
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २ जी डाटा मोफत
  • नववी, दहावी, अकरावीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन आहार
  • वृद्धांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ
  • मद्रास उच्च न्यायालयाचं नामांतर तामिळनाडू उच्च न्यायालय असे करणार
  • श्रीलंकन निर्वासितांना दुहेरी नागरिकत्व आणि राहण्याचा परवाना देणार
  • सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पुनर्विचार करण्यासाठी केंद्राला विनंती करणार
  • मातृत्व रजा वाढविण्यात येणार
  • अम्मा बॅंकिंग कार्ड
  • शहरात अण्णा पेट्रोल वाहन
  • रिक्षाचालकांसाठी एमजीआर ऑटो योजनेतंर्गत अनुदान देण्याची घोषणा

तमिळनाडू राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार २३४ जागांसाठी ही आगामी निवडणूक पार पडणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ मार्च तर हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २२ मार्च आहे. या राज्यात ६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.

- Advertisement -

भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी रविवारी १४ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन तामिळनाडूतील पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर वरिष्ठ सदस्यांच्या उपस्थित तामिळनाडूमध्ये भाजप २० विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली. या माहितीनुसार, तामिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष एल मुरूगन धारापुरम आणि एच. राजा कराईकुडीमधून निवडणूक लढणार आहेत. तर कोयंबत्तूर दक्षिणमधून वनाथी आणि अभिनेत्री खुशबू सुंदर थाऊजंड लाईट्समधून निवडणूक लढणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -