अमेरिकेच्या दक्षिण इंडियानामध्ये भीषण स्फोट, 3 जण ठार

अमेरिकेच्या दक्षिण इंडियाना येथील इव्हान्सविले शहरात भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला असून, या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेच्या दक्षिण इंडियाना येथील इव्हान्सविले शहरात भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला असून, या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 39 घरांचे नुकसान झाले आहे. (Terrible explosion in southern Indiana USA 3 people killed vp96)

अमेरिकेतील इव्हान्सविले शहरात बुधवारी झालेल्या या स्फोटाचे अद्याप कारण समजलेले नाही. मात्र या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अल्कोहोल, तंबाखू, फायरआर्म्स आणि एक्सप्लोझिव्ह ब्युरोचे अधिकारी दाखल झाले असून, या स्फोटाचा तपास करत आहेत.

या स्फोटात मृत्यू झालेल्या नागरिकांची ओळख कुटुंबियांशी पटत नाहीत तोपर्यंत या मृतांची माहिती दिली जाणार नसल्याचे वँडरबर्ग काउंटीचे मुख्य डेप्युटी कोरोनर डेव्ह अॅन्सन यांनी म्हटले. दरम्यान, ‘कोरोनर’ हा सरकारी किंवा न्यायिक अधिकारी असतो ज्याला मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करण्याचा किंवा मृत व्यक्तीच्या ओळखीची पुष्टी करण्याचा अधिकार असतो.

या स्फोटाबाबत इव्हान्सविले अग्निशमन विभागाचे प्रमुख माईक कोनेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 1 वाजता झालेल्या स्फोटात एकूण 39 घरांचे नुकसान झाले आहे. किमान तीन जण जखमी झाले आहेत.

पाच वर्षांत ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 27 जून 2017 रोजी झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता, तर तीन जण जखमी झाले होते.


हेही वाचा – काळी जादूसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगणं बंद करा, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल