घरदेश-विदेशश्रीलंका बॉम्बस्फोट: 'तोहिथ जमात' संघटनेवर संशय, भारतात 'या' ठिकाणी सक्रीय

श्रीलंका बॉम्बस्फोट: ‘तोहिथ जमात’ संघटनेवर संशय, भारतात ‘या’ ठिकाणी सक्रीय

Subscribe

नॅशनल तोहिथ जमातचे जहरान हासिम आणि त्यांच्या काही साथिदारांनी या आत्मघाती हल्ल्याचा कट रचला होता.

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरला आहे. रविवारी इस्टर संडेला श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ८ साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत २९० जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी २४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने नाही. मात्र या हल्ल्याच्या मागे ‘नॅशनल तोहिथ जमात’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

भारतातल्या तामिळनाडूत सक्रीय

तोहिथ जमात ही एक कट्टरतावादी इस्लामिक दहशतवादी संगठना आहे. तामिळनाडूमध्ये यांचा एक ग्रुप सक्रिय आहे. मात्र अद्याप तोहिथ जमात या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याचा जबाबदारी स्विकारली नाही.

१० दिवसापूर्वीच दिला होता हाय अलर्ट

श्रीलंकेत झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीलंका पोलीस प्रमुखांनी १० दिवस आधीच देशभरामध्ये हाय अलर्ट जारी केला होता. रविवारच्या आधी आत्मघाती हल्लेखोर देशातील प्रमुख चर्चला लक्ष्य करु शकतात. आता श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल बिक्रमसिंघे यांनी देखील हा दावा खरं असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

हल्ल्याच्या आधी केला होता सराव

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल तोहिथ जमातचे जहरान हासिम आणि त्यांच्या काही साथिदारांनी या आत्मघाती हल्ल्याचा कट रचला होता. हे सर्व साखळी बॉम्बस्फोट करण्याआधी त्यांनी यासाठी सराव केला होता. तसंच या दहशतवादी संघटनेने१६ एप्रिलला स्फोटकांनी भरलेली एक कार कतांनकुडीजवळील पालमुनाई येथे सोडली होती.

अशी आहे या संघटनेची ओळख

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेमध्ये तोहिथ जमात दहशतवादी आणि वादग्रस्त प्रचार आणि प्रसारासाठी ओळखली जाते. देशाच्या पूर्व प्रांताच्या दिशेने त्यांचा विस्तार अधिक आढळला जाते. ही दहशतवादी संघटना श्रीलंकेमध्ये कट्टरतावादी संदेशांच्या प्रसार करण्यासाठी महिलांसाठी बुर्खा, मशीद बनवण्यासोबतच शरिया कायदा वाढवण्यासाठी काम करत आहे.

२४ संशयितांना अटक

श्रीलंकेत ८ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आतापर्यंत २४ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीलंका सरकारने सांगितले की, यामधील जास्त बॉम्बस्फोट हे आत्मघाती होता. मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानींसह एकूण ३५ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटात ३ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही केरळचे राहणारे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -