घरदेश-विदेशपत्रकार दानिश सिद्दीकीच्या मृत्यूबाबत अफगाणी कमांडरने केला मोठा खुलासा

पत्रकार दानिश सिद्दीकीच्या मृत्यूबाबत अफगाणी कमांडरने केला मोठा खुलासा

Subscribe

जगातील नामांकित फोटो जर्नलिस्टमध्ये दानिश यांचे नाव घेण्यात येते.

 

16 जुलै रोजी अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या स्पिन बोल्दक शहरावरील बाजरपेठेवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्ना दरम्यान चकमक झाली होती. या दरम्यान एका अफगाण अधिकाऱ्यासह पुलित्जर पुरस्कार विजेते फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. पण नुकतच सिद्धीकी यांच्या मृत्यूबाबत एक खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. आजतक या वृत्तवाहिनीने अफगाण सैन्याचे कमांडर बिलाल अहमद यांच्याशी बातचीत केली आसता, बिलाल यांनी सांगितल्याप्रमाणे तालिबानने दानिश यांच्या मृतदेहासोबत फार वाईट कृत्य केलं. ” तालिबानच्या दहशतवाद्यांना समजलं की दानिश भारतीय आहे. यानंतर त्यांनी गोळी मारल्यानंतर दानिशचा मृत्यू झाल्यावरही त्यांनी त्याच्या डोक्यावर गाडी चढवली तसेच त्याचे डोकं चिरडलं. अशा प्रकारे दानिशच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली.” इतकचं नाही तर कमांडर बिलाल अहमद यांनी सांगितले की तालिबानी भारतीयांचा राग करताता हाच असंतोष,चिढ मनात बाळगून त्यांनी असे अमानविय कृत्य केल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

जगातील नामांकित फोटो जर्नलिस्टमध्ये दानिश यांचे नाव घेण्यात येते. अफगाणिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराचे वृत्तांकन करण्यासाठी ते गेले काही दिवस कंदहारमध्येच होते.दानिश यांच्या डेथ सर्टीफिकेटमध्ये त्यांचा मृत्यू गोळी लागल्यामूळे झाला असल्याची नोंद करण्यात आली होती. पण आता दानिश यांच्या मृतदेहासोबत करण्यात आलेल्या अमानुषपणामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.


हे हि वाचा – फाळणीनंतर भारतात पहिल्यांदाच ५० लाख मृत्यूला कोरोना जबाबदार – अमेरिकेतील संशोधन

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -