Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 2008 नंतरचे सर्वात मोठे बँकिंग संकट, अमेरिकन सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचे...

2008 नंतरचे सर्वात मोठे बँकिंग संकट, अमेरिकन सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचे आदेश

Subscribe

नवी दिल्ली : जगभरातील स्टार्टअप्सना निधी पुरवणारी अमेरिकन सिलिकॉन व्हॅली बँक आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. ही बँक गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे समजते. सिलिकॉन व्हॅली बँकेची आर्थिक स्थिती पाहता कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने बँकेला टाळे ठोकण्याचे आदेश दिले आहेत. ही बँक बंद होण्याच्या बातमीचा परिणाम जगभरातील बाजारांवर दिसून आला आहे. या बँकेच्या दिवाळखोरीमुळे बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसह भारतीय स्टार्टअपचीही चिंता वाढली आहे.

14 फेब्रुवारी 2023 रोजी अमेरिकेच्या प्रसिद्ध व्यावसायिक मासिक फोर्ब्सने 100 सर्वोत्तम बँकांची 14वी वार्षिक यादी जाहीर केली होती. सिलिकॉन व्हॅली बँकेची मूळ कंपनी एसव्हीबीच्या आर्थिक गटाला फोर्ब्सने या यादीत 20 व्या स्थानावर ठेवले होते. यानंतर 7 मार्च, 2023 रोजी एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपने ट्विट केले की फोर्ब्सच्या यादीत सतत समाविष्ट केल्याबद्दल अभिमान वाटतो. या ट्विटनंतर अवघ्या तीन दिवसांनी अमेरिकेच्या नियामकांनी जवळपास 40 वर्षांपासून सुरू असलेली सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर सिलिकॉन व्हॅली बँक आणि एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पुलवामा शहिदांच्या पत्नींची निदर्शने, राजस्थानमध्ये भाजपच्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज

सिलिकॉन व्हॅली बँकेची आर्थिक स्थिती पाहता कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बँकेच्या ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेची जबाबदारी कॅलिफोर्निया बँकिंग नियामकाने फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) वर सोपवली आहे.

- Advertisement -

सिलीकॉन व्हॅली ही अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक आहे. ही बँक 2008 च्या आर्थिक संकटानंतर बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठे संकट म्हणून उदयास आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सुमारे $2 अब्जांचे नुकसान झाले असल्याचे बँकेने सांगितले होते. यूएस नियामकाने सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपचे शेअर्स 70 टक्क्यांनी घसरले होते. यासोबतच भारतासह इतर बाजारपेठांवरही याचा परिणाम दिसून झाला.

 

 

- Advertisment -