घरदेश-विदेशभयंकर! उंदराने कुरतडला वृद्ध कोरोना रुग्णाचा मृतदेह

भयंकर! उंदराने कुरतडला वृद्ध कोरोना रुग्णाचा मृतदेह

Subscribe

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच कोरोना रुग्णांचे बळीदेखील जात आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये याकरता कोरोना रुग्णांचे मृतदेहदेखील पीपीई किट परिधान केलेले कर्मचारीच अंत्यविधीसाठी घेऊन जात आहेत. मात्र कोरोना रुग्णांचा मृतदेहच कुरतडून छिन्नविछिन्न केला गेला तर किती विषाणू हवेत पसरतील याची कल्पनाही करवत नाही. अशीच एक धक्कादायक घटना इंदौरच्या हॉस्पिटलमध्ये घडली आहे. येथील ८७ वर्षीय वृद्ध कोरोना रुग्णाचा मृतदेह चक्क उंदराने कुरतडून टाकला आहे. या रुग्णाच्या नातेवाईकांनी हा मृतदेह पाहून संताप व्यक्त केला असून हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदौरच्या युनिक हॉस्पिटलमध्ये विनय नगर जैन कॉलनीत राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीला चार दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र नंतर अचानक हॉस्पिटलमधून त्यांच्या मृत्यूची बातमी आली. त्यांच्या नातलगांनी सांगितले की, जर त्यांचा मृत्यू रात्री झाला होता तर तेव्हाच आम्हाला सांगायला हवे होते. रात्रभर हॉस्पिटलमध्ये मृतदेह ठेवल्याने उंदरांनी तो कुरतडला, तसे तरी झाले नसते. त्यांचे कुटुंबिय जेव्हा हॉस्पिटलमध्ये मृतदेह घेण्यासाठी गेले तेव्हा तो कुरतडलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाचे कान, डोळे, नाक, बोटं उंदराने खाल्ली होती. हॉस्पिटल प्रशासनाने त्यांचा मृतदेह व्यवस्थित ठेवला नव्हता. हॉस्पिटलने तब्बल एक लाख रुपये घेतल्यानंतर मृतदेह ताब्यात दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता या प्रकरणी चौकशीचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

बारामतीत ४६ लाखांचा गांजा जप्त; चार अरोपींना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -