घरताज्या घडामोडीकोविन पोर्टलमध्ये पुढील आठवड्यापासून हिंदीसह १८ भाषांचा समावेश, कोविड परीक्षण लॅब जोडणार

कोविन पोर्टलमध्ये पुढील आठवड्यापासून हिंदीसह १८ भाषांचा समावेश, कोविड परीक्षण लॅब जोडणार

Subscribe

कोरोना चाचणीचे परीक्षण करणाऱ्या १८ लॅबला देखील या पोर्टलवर जोडण्यात येणार

देशात कोरोनाविरोधात लढाई सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी लाभार्थ्याला कोविन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोविन पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर नागरिकांना लसीचा डोस देण्यात येत आहे. सध्या देशात सर्व जिल्ह्यात कोविन पोर्टल वापरण्यात येत आहे. यामध्ये फक्त इंग्रजी भाषेचा समावेश आहे. परंतु पुढील आठवड्यात हिंदीसह १८ प्रादेशिक भाषांमध्ये कोविन पोर्टल उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच कोरोना चाचणीचे परीक्षण करणाऱ्या १८ लॅबला देखील या पोर्टलवर जोडण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्वात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत कोविन पोर्टलवर भाषांचा समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी १७ नवीन लॅबला या INSACOG network पोर्टलमध्ये जोडण्यात येणार आहे. यामुळे कोरोना चाचण्या जलदगतीने करण्यात मदत होणार आहे. यामधील १० लॅ देशातील विविध भागातील आहेत.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशात मागील २६ दिवसांमध्ये पहिल्यांदाच ३ लाखांपेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे देशातील स्वदेशी कोविड विरोधी औषध २-डी-ओक्सी-डी ग्लूकोज किंवा २-डी औषध निर्माण करण्याचा प्रयत्न केला यासाठी अभिनंदन केले आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात या औषधाच्या निर्मितीसाठी संशोधन सुरु केले होते ते आता संपले असून औषध तयार करण्यात आले आहे. हे औषध कोरोनाच्या आजारावर प्रभावशाली असल्याने देशात उपयुक्त ठरु शकते.

- Advertisement -

तसेच कोरोना महामारीशी लढण्यासाठी केंद्र सरकार मदत करत आहे. आतापर्यंत ४२२.७९ लाख एन ९५ मास्क, १७६९.९१ लाख पीपीई किट, ५२.६४ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ४५ हजार ६६ व्हेंटिलेटर पुरवण्यात आले आहेत. तसेच नव्या १० कोरोना चाचणी परीक्षण लॅबची सुरुवात करण्यात येत आहे. एकुण १७ लॅब कार्यान्वित करण्यात आले आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -