घरदेश-विदेशउत्तराखंडात जोशीमठजवळ दरड कोसळली; बद्रीनाथ यात्रा थांबवली

उत्तराखंडात जोशीमठजवळ दरड कोसळली; बद्रीनाथ यात्रा थांबवली

Subscribe

मुंबई | उत्तराखंडमधील (Uttarakhand) जोशीमठजवळ (Joshimath) गुरुवारी दरड कोसळली. यामुळे बद्रीनाथ महामार्ग ( Badrinath Highway) पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यानंतर बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना अडवण्यात आले असून चारधाम यात्रा देखील थांबवण्यात आली आहे. या महामार्गावरील दरड कोसळल्याचा (Landslides) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोशीमठजवळील हेलंग खोऱ्यात एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी बोगदा बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी जमिनीखील सुरूंगा लावल्यामुळे दरड कोसळली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

गौचर पोलिसांनी बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना कर्णप्रयाग आणि लंगासू या सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आल्याची माहिती दिली आहे. या महार्मागवरील वाहतूक ठप्प असल्याने हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. याबाबत कर्णप्रयागचे सीओ अमित कुमार म्हणाले, “बद्रीनाथ रस्ता सुरू झाल्यानंतर प्रवाशांना जाण्यासाठी परवानगी दिली जाईल. तोपर्यंत कोणालाही प्रवास करण्याची परवानगी नाही”, अशी माहिती दिली आहे. या बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली सापडलेल्या कारमधून प्रवास करणारे दोन प्रवासी जखमी झाले आहे.

- Advertisement -

या महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून या महामार्ग सुरळीत होण्यासंदर्भात आज रात्रीपर्यंत माहिती मिळेल. तसेच यात्रेकरूंना प्रवासाबाबत अपडेट मिळाल्यानंतर प्रवासाला सुरुवात करावा, असे आवाहन एसपी चमोली प्रमेंद्र डोवाल यांनी सांगितले.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -