घरदेश-विदेश'माझ्या मुलीला भारतात परत आणा' वडिलांचे पंतप्रधानांना साकडे!

‘माझ्या मुलीला भारतात परत आणा’ वडिलांचे पंतप्रधानांना साकडे!

Subscribe

मागील काही दिवसांपूर्वी डायमंड क्रूजमध्ये एक भारतीय महिला अडकली होती, तिची सुटका करण्यात यावी असे विनंती पत्र तिच्या वडीलांनी पंतप्रधानांना लिहीले आहे.

चीनसह इतर देशांमध्ये कोरोना वायरसने थैमान घातले असून चीनमद्ये अडकलेल्या भारतीयांना सरकारने मायदेशात आणले आहे. याचदरम्यान काही दिवसांपूर्वी डायमंड क्रूजमध्ये एक भारतीय महिला अडकल्याचे  समोर आले, तिची सुटका करण्यात यावी असे विनंती पत्र तिच्या वडीलांनी पंतप्रधानांना लिहीले आहे. दिनेश ठक्कर असे त्यांचे नाव आहे.  ‘माझी मुलगी सोनाली ठक्करला डायमंड क्रूजमधील एका लहान खोलीत ठेवण्यात आलं आहे. मात्र तिला कोरोना वायरस झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिची सुटका करण्यात यावी’, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे.

नेमके काय झाले?

मुलीची सुटका व्हावी यासाठी दिनेश ठक्कर यांनी पत्रात म्हटल आहे की, ‘मी भारताचा नागरिक असल्याच्या अधिकाराने लिहीत आहे. माझी मुलगी सोनाली ठक्कर ही डिसेंबर २०१९ पासून डायमंड प्रिंसेस क्रूजवर काम करत आहे. मात्र या जहाजातून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना कोरोना वायरसची लागन झाल्याने हे जहाज योकोहामा येथे थांबवण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

काय आहे पत्रात?

सोनालीची जहाजातून लवकर सुटका करण्यात यावी यासाठी तिच्या वडीलांनी पत्रात लिहीले आहे की, ‘माझ्या मुलीला कोरोना वायरस झालेला नाही. मात्र तरीही तिला मागच्या १५ दिवसांपासून एका लहान खोलीत ठेवण्यात आले आहे. तसेच या पत्राद्वारे मी भारत सरकारला विनंती करतो की, त्यांनी मला माझ्या मुलीला भारतात परत आणण्यासाठी मदत करावी’ त्यांनी पुढे लिहीले आहे की, ‘तिचा जीव धोक्यात आहे कारण ती कोरोना वायरस झालेल्या इतर प्रवाशांसह क्रूजमध्ये आहे’. सोनाली ठक्करने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोरोना वायरस झालेल्या रूग्णांना सोडवण्यासाठी सरकार फार उशीर करत असल्याचे तिने सांगितले होते. या दरम्यान भारतीय दूतावासने दिलेल्या वृतानूसार डायमंड क्रूजमधील आठ प्रवाशांमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -