घरदेश-विदेश'ऑपरेशन कावेरी'अंतर्गत सुदानमध्ये अडकलेले एवढे भारतीय परतले मायदेशी

‘ऑपरेशन कावेरी’अंतर्गत सुदानमध्ये अडकलेले एवढे भारतीय परतले मायदेशी

Subscribe

मुंबई | अंतर्गत संघर्षग्रस्तामुळे सुदानमध्ये युद्ध सुरू आहे. यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सरकारने ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) सुरू केले आहे. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पाचवी तुकली आयएनएस तेग (INS Teg) मधून २९७ प्रवाशांना घेऊन निघाली आहे. तसेच अजून २४६ भारतीयांना विमानाने सुदानमधून मुंबईत आणले आहेत. यामुळे आता सुदानमधून जवळपास १ हजार ७०० ते २ हजारपर्यंत भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात सरकारला यश आले आहे.

अरिंदम बागची यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “#ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) सुरूच आहे. अंतर्गत संघर्षग्रस्त सुरू असलेल्या सुदानमधील आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी सरकारने सोमवारी ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे.” या ऑपरेशन अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या ३६० भारतीय बधुवारी रात्री नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. सुदामध्ये जवळपास तीन हजार भारतीय अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत सुदानमधील अडकलेल्या भारतीयांना जहाजाच्या मार्गे सौदीची राजधानी जेद्दाहमध्ये आणावे लागले. यानंतर हवाई मार्गे सर्व सुदानमधील लोकांना भारतात आणले.

- Advertisement -

गेल्या दहा दिवसांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निम लष्कर दलात संघर्ष सुरू आहे. या देशातील अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत. सुदानमधील संघर्षात आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या संघर्षामुळे सुदानमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यानंतर भारतीय सरकारने सुदान सरकारशी संपर्क करून ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे. यासाठी भारत सरकारने सुदान संपर्क केल्यानंतर त्यांनी तीन दिवस युद्धबंदी घोषित केली आहे. येत्या काही दिवसांत सर्व ऑपरेशन कावेरीच्या अंतर्गत भारतीय नागरिकांन सुखरुप मायदेशी आणण्यात येणार आहे. या संघर्षामुळे सुदानमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी आणि जीवितहानी झालेली आहे. पहिल्या तुकडीत २७८ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. तर दुसऱ्या तुकडीत २४६ भारतात परतले आहेत.

- Advertisement -

सुदानमधील संघर्षामुळे जीवितहानी तर झालीच आहे. परंतु, अन्न-पाण्याचा अभाव आणि मुलभूत आरोग्य सेवांच्या तुटवड्यामुळे अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -