घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोना हे आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं अदृश्य युद्ध! - राजनाथ सिंह

CoronaVirus: कोरोना हे आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं अदृश्य युद्ध! – राजनाथ सिंह

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या २४ लाखांहून अधिक झाली आहे. देशात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी देशातील २१ दिवसांचा लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना चिंता व्यक्त केली आहे. ते पीटीआयशी बोलताना म्हणाले की, कोरोना विषाणूच्या विरोधातील युद्ध हे आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं अदृश्य युद्ध आहे.

तसंच आता सैन्याच्या सुरक्षेसाठी सर्व जवानांना आणि कर्मचाऱ्यांना दैनंदिन संपर्क डायरी अपडेट ठेवण्यास सांगण्यात आली आहे. याशिवाय सामूहिक प्रशिक्षण कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत. जिथे सोशल डिस्ट्न्सिंगचं पालन करणं कठीण आहे. तिथे सर्वप्रकारची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

- Advertisement -

सध्या देश कोरोनाचा युद्ध स्थरावर सामना करत आहे. या युद्धात सरकारी संस्था समन्वयानं काम करत आहे. संवाद तंत्र, पुरवठा साखळी व्यवस्थापन, वैद्यकीय सहाय्य आणि अभियांत्रिकी यात शस्त्र दलाचाही वापर केला जात आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

इंडिया कोविड-१९ ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७ हजार ३५७वर पोहोचली आहे. त्यापैकी ५६० जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजारहून अधिक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर माणसाला भविष्यात कोरोनाहून जीवघेण्या महामारीसाठी सज्ज राहावे लागेल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -