मुलीला बिझनेसमध्ये रस नाही; मालकाने घेतला मोठा निर्णय; म्हणाले…

आम्ही हा व्यवसाय संभाळण्यासाठी आम्ही दुसरा पर्याय शोधात आहोत

देशातील सर्वात मोठी पॅक्ड वाॅटर मेकर बिसलेरीचे अध्यक्ष रमेश चौहान हे त्यांचा व्यवसाय विकत आहेत. त्यामुळे ते खरेदीदाराच्या शोधात आहेत. या संदर्भांत यासाठी टाटा कन्झ्युमर प्राॅडक्ट लिमिटेडसहित अनेक कंपन्यांशी चर्चा सुरु आहे. टाटा समुह या साठी प्रमुख दावेदार असल्याचे सांगितले जात आहे. बिसलेरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रमेश चौहान हे आता 82 वर्षांचे आहेत. याच संदर्भांत रमेश चौहान यांना व्यवसाय विकण्याचे कारण विचारले असता त्यांनी आश्चर्यकारक उत्तर दिले.

याच संदर्भांत रमेश चौहान या संदर्भात पुढे म्हणाले, बिसलेरीचा हा व्यवसाय भविष्यात कुणालातरी सांभाळावा लागणार आहे आणि त्यासाठीच आम्ही योग्य पर्याय कोण असेल त्याच्या शोधात आहोत. कारण माझ्या मुलीला म्हणजेच जयंतीला या व्यवसायात रस नाही म्हणूनच आम्ही हा व्यवसाय संभाळण्यासाठी आम्ही दुसरा पर्याय शोधात आहोत आणि म्हणूच मी हा निर्णय घेतल्याचे रमेश चौहान यांनी सांगितले.

Bisleri - 500 ml Water - 24X7 Patna Kirana

करारावर बोलण्यास नकार
टाटा आणि बिसलेरी यांच्यातील 7000 कोटी मूल्यांसंदर्भातही रमेश चौहान यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी या करारासंदर्भांत फार काही बोलण्यास नकार दिला. दरम्यान व्यवसाय विक्रीच्या निर्णयावर मात्र त्यांनी होकार दिला. यासाठी आम्ही संभावित खरेदीदारांच्या शोधात आहोत. टाटा कन्झ्युमरसोबत होत असलेल्या करारासंदर्भातही कंपनीचे प्रवक्ते बोलले नाहीत.

साॅफ्ट ड्रिंकचा व्यवसायसुद्धा विकला
रमेश चौहान यांनी तीस वर्षांपूर्वी आपला साॅफ्ट ड्रिकचा व्यवसाय कोका कोला या अमेरिकास्थित कंपनीला विकला होता. त्यांनी थम्प्स अप, गोल्ड स्पाॅट, माजा आणि लिम्का सारखे ब्रँड्स 1993 मध्ये कंपनीला विकले होते.  2016 मध्ये ते पुन्हा साॅफ्ट ड्रिक व्यवसायात उतरले. पण त्यांच्या बिसलेरी पाॅप या उत्पादनाला फारशी बाजारपेठ मिळाली नाही.


हे ही वाचा – फडणवीसांचं वक्तव्य चिथावणीखोर, त्यांचं स्वप्न पूर्ण होणारच नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जहरी टीका