घरदेश-विदेशWorkFromWedding:नवरदेवाने चक्क लग्नमंडपातचं सुरू केलं लॅपटॉवर काम, व्हिडिओ होतोय व्हायरल

WorkFromWedding:नवरदेवाने चक्क लग्नमंडपातचं सुरू केलं लॅपटॉवर काम, व्हिडिओ होतोय व्हायरल

Subscribe

मजेशीर व्हिडिओला इंस्टाग्रामवर dulhaniyaa नावाच्या एका अकांउटवरून शेअर करण्यात आले आहे.

देशभरात गेल्या दीड वर्षापासून कोरोना व्हायरसचे संकट देशावर कायम आहे. सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चैन’ या मोहीमे अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. तसेच लग्न समारंभाकरिता काही नियामवली आखून देत ते पाळणे बंधनकारक असल्याचे जाहीर करण्यात आल्याने अनेकांनी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा पार पाडला याचदरम्यान संपुर्ण देश गेले अनेक महिने घरामध्ये राहूनच आपली महत्वाची कामे तसेच वर्क फॉर्म होम करण्यास प्राधान्य देत होते. अशातच आता एका विवाह सोहळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव चक्क लग्नमंडपात मंत्रपठणाच्या वेळीस लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. सध्या या नवरदेवाची चर्चा त्याच्या वर्क फॉर्म वेडींग निमीत्त तुफान रंगत आहे.

व्हिडिओमध्ये नवरदेव मंडपात पाटावर बसून लॅपटॉवर काम करण्यात व्यस्त आहे.तर एकिकडे भटजी मंत्रोउच्चार करत लग्नातील विधी उरकण्यात व्यस्त आहेत. पण नवरदेवही चांगलाच कामात रमला होता त्याने संपुर्ण काम उरकल्यानंतर पुढील वीधी करण्यास सुरूवात केली. आपल्या होणाऱ्या नवरा लग्नाच्या दिवशी सुद्धा इतकी मेहनत घेत आहे हे पाहून वधूला देखील हसू आवरले नाही व्हिडिओमध्ये नवरी प्रचंड हसताना दिसत आहे.

व्हिडिओ पाहा
- Advertisement -

या मजेशीर व्हिडिओला इंस्टाग्रामवर dulhaniyaa नावाच्या एका अकांउटवरून शेअर करण्यात आले आहे. या व्हिडिओने सध्या इंटरनेटवर धूमाकूळ माजवला आहे. अनेक नेटकऱ्यांनी याला मजेशीर कंमेंट करत प्रतिक्रीया दिल्या आहेत.

- Advertisement -

हे हि वाचा – हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेले असता दरड कोसळून नागपूरच्या तरुणीसह 9 जणांचा मृत्यू

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -