घरट्रेंडिंग‘त्या' पाहताच बाला... मुलगा बेशुद्ध झाला, थेट रुग्णालयात दाखल

‘त्या’ पाहताच बाला… मुलगा बेशुद्ध झाला, थेट रुग्णालयात दाखल

Subscribe

आज परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी मध्यंतरीची प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी आली होती. गणिताची परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये होती.

बिहार इंटरमिजिएट परीक्षा १ फेब्रुवारीपासून सुरू झाली. दुसरीकडे नालंदामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. परीक्षेसाठी बसलेला असताना आपल्या आजुबाजुला ५०० मुलींना पाहून मुलगा परीक्षा केंद्रातच बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी बिहार शरीफ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे.

मणिश शंकर असं या परिक्षार्थी विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मनीष शंकर अल्लामा इक्बाल कॉलेजमध्ये शिकतो. तेथून त्याने इंटरमिजिएट परीक्षेचा फॉर्म भरला. या परिक्षेसाठीचं केंद्र त्याला बिहार शरीफच्या ब्रिलियंट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मिळालं. मणिशंकर आज तिथे परीक्षा देण्यासाठी गेला असता तिथे सगळीकडे फक्त मुलीच्या बसलेल्या त्याने पाहिलं. या परीक्षा केंद्रावर जवळपास ५०० मुली होत्या, या सगळ्या मुलींमध्ये फक्त तो एकटाच मुलगा होता.

- Advertisement -

मुलींना पाहून त्याची अशी अवस्था झाली…
परीक्षा केंद्रामध्ये सगळ्या मुलीच आणि मुलांमध्ये तो एकटाच असलेला पाहून परीक्षा देत असताना घाबरला आणि परीक्षा केंद्रामध्येच खाली कोसळला. त्यानंतर त्याला बिहार शरीफ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतक्या साऱ्या मुलींपैकी केवळ एकच मुलगा केंद्रात कसा बसला, अशा प्रकारे परीक्षार्थी घाबरणे स्वाभाविक आहे, असा आरोप मनीष शंकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पेपर फुटल्याची बातमी
आज परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी मध्यंतरीची प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी आली होती. गणिताची परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये होती. सकाळी ९.०० वाजता अचानक एक पेपर व्हायरल झाला, ज्याचा संबंध पेपरफुटीशी होता, परंतु व्हायरल झालेल्या पेपरची परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तुलना केली असता एकही प्रश्न सापडला नाही. एफ गटाची ही व्हायरल प्रश्नपत्रिका पूर्णपणे वेगळी होती. मुखपृष्ठच पूर्णपणे चुकीचे होते. प्रश्न आणि एकूण प्रश्नांचे गुणोत्तरही चुकीचे होते. या परीक्षेला १३ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -