घरदेश-विदेशपंतप्रधानांनी सोशल मीडियावरील प्रोफाइलवर लावला 'तिरंगा'

पंतप्रधानांनी सोशल मीडियावरील प्रोफाइलवर लावला ‘तिरंगा’

Subscribe

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत २ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाइल पिक्चर्समध्ये तिरंगा ठेवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमांतर्गत केले. त्यांनी आपल्या प्रोफाइलमध्ये तिरंग्याचे चित्र ठेवले आहे. त्याचबरोबर भाजपाच्या अन्य प्रमुख नेत्यांनी देखील आपल्या तसा बदल केला आहे.

- Advertisement -

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच भारताच्या एकता, अखंडता आणि गौरवाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाचे रेखाटन करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त सोशल मीडियाच्या प्रोफाइलमध्ये तिरंगा ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचा फोटो बदलून तिरंगा ठेवला आहे. त्यांच्याबरोबरीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वाणिज्य व उद्योममंत्री पीयूष गोयल, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सूक्ष्म, लघू, आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी प्रोफइलमध्ये तिरंग्याचा फोटो लावला आहे.

तर, राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा आमदार, अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांनी देखील आपल्या प्रोफाइलमध्ये राष्ट्रध्वजाचे चित्र लावले आहे.

- Advertisement -

‘यांचे’ मात्र आपलेच फोटो
आमदार सुधीर मुनगंटीवार, भाजपा आमदार अॅड. आशीष शेलार, शिवसेना नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे किरीट सोमैया, प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अद्याप तिरंगा झळकलेला नाही.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -