घरदेश-विदेशउत्तर प्रदेशात देशातील लसीकरणाचा पहिला घोटाळा, यादीत मृतांचा समावेश

उत्तर प्रदेशात देशातील लसीकरणाचा पहिला घोटाळा, यादीत मृतांचा समावेश

Subscribe

दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार

देशात मागील १० महिन्यांपासून कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी बहुप्रतिक्षीत कोरोना लस तयार करण्यात आली आहे. ही लस पूर्णपणे भारतीय बनावटीची असून येत्या १६ जानेवारी २०२१ पासून देशात कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने कोरोना लसीच्या ११ लाख कोटी डोसची ऑर्डर सीरम इन्स्टिट्यूटला दिली आहे. या ऑर्डरनंतर सीरम इन्स्टिट्यूमधून मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोव्हिशील्ड कोरोना लसीचे डोस कोल्ड स्टोरेज कंटेनरमधून रवाना करण्यात आले आहेत. देशातील १३ शहरांत कोरोना लसीचे डोस पोहोचले आहेत. परंतु देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्यामध्ये लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या यादीत मोठा घोळ झाला असल्याचे उघडकीस आले आहे.

देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी प्रत्येक राज्यात कोरोना लस देण्यासाठी लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. मात्र उत्तप्रदेशमधील अयोध्यामध्ये कोरोना लस देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये मृत नर्स, निवृत्त आणि करार संपुष्टात आलेल्या काही डॉक्टरांचाही समावेश करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशात ८५२ केंद्रांवर १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. देशभरात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु उत्तरप्रदेशातील आयोध्यात तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये घोळ झाल्याचे उघडकीस येताच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जय प्रताप सिंह यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांची संख्या कमी आहे. तसेच स्वतंत्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांची संख्या केवळ ८ ते १० हजारांत आहे. यामुळे उत्तरप्रदेशातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होतो. यासाठी सरकार थेट लोकसेवा आयोगातून भरती प्रक्रिया राबवली जाईल अशी माहिती आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री जय प्रताप सिंह यांनी दिली आहे. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर १५०० केंद्रांवर लसीकरणाची रंगीत तालीमही पार पाडण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -