घरताज्या घडामोडी...तर १५ वर्षे नोकरी करता येणार, अग्निपथ योजनेतील नवी माहिती समोर

…तर १५ वर्षे नोकरी करता येणार, अग्निपथ योजनेतील नवी माहिती समोर

Subscribe

अग्निपथ योजनेतून ज्यांची भरती केली जाईल त्यांना अग्निवीर संबोधण्यात येणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून देशात अग्निपथ योजनेची (Agneepath Scheme)चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गत देशातील युवकांना राष्ट्रसेवा करण्याची संधी मिळणार आहे. सोबतच, त्यांना चांगला पगार आणि पेन्शनही मिळणार आहे. पण ही सेवा चारच वर्षे करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी बेरोजगारी आणखी वाढेल असा दावा करण्यात येतोय. मात्र, या दाव्यावर लेफ्टनंट जनरल बीएस राजू उत्तर देत नवी माहिती दिली आहे. दरम्यान, अग्निपथ योजनेतून ज्यांची भरती केली जाईल त्यांना अग्निवीर संबोधण्यात येणार आहे. (… then you can work for fifteen years, new information about Agneepath scheme by central government)

हेही वाचा – ४ वर्षांची नोकरी, सेवानिधी पॅकेज अन् बरेच काही; जाणून घ्या, सैन्यातील अग्निपथ योजनेची वैशिष्ट्ये

- Advertisement -

अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर केवळ चारच वर्ष सेवा देता येणार आहे असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच, या योजनेअंतर्गत वायू सेना आणि नेवीमध्ये तीन हजार अग्निवीर भरती केली जाणार आहे. या भरतीची संख्याही दरवर्षी वाढवण्यात येणार आहे. अग्निवारांच्या प्रत्येक बॅचमधून २५ टक्के चांगले सैनिक पुढील १५ वर्षे नियमित कॅडरमध्ये सहभागी होऊ शकतील. तर, उर्वरित ७५ टक्के लोकांना चार वर्षांनंतर काढून टाकलं जाईल. म्हणजेच, अग्निवीर बॅचमध्ये निवडलेल्या गेलेल्या सैनिकांचं मुल्यांकन करून त्यांची परीक्षा घेण्यात येणार. या परीक्षेत पास ठरलेल्या २५ टक्के अग्निवीर पुढील १५ वर्षे आपली सेवा सुरू ठेवू शकतात.

हेही वाचा – सैन्यातील अग्निपथ योजनेवर तरुणांचा संताप, सैन्य भरतीच्या नियमांना विरोध

- Advertisement -

वाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ लेफ्टिनेंट जनरल बीएस राजू पुढे म्हणाले की, सरकारच्या या योजनेअंतर्गत २०३०-३२ पर्यंत १२ लाख सैन्यकर्मीमध्ये ५० टक्के अग्निवीर असतील. लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली, तेव्हा ते बोलत होते.

अग्निपथ योजना जाहीर झाल्यापासून देशभर हलकल्लोळ माजला आहे. अनेकांनी या योजनेला विरोध केला आहे. मात्र, बीएस राजू यांनी या योजनेची प्रभावी माहिती या मुलाखतीत दिली. ते म्हणाले की, या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी भरती करण्यात येणार आहे. दरवर्षी भरतीची संख्या वाढवण्यात येणार आहे. यावर्षी ४० हजार लोकांची भरती करण्यात येणार असून पुढली सात ते आठ वर्षांत ही संख्या १.२ लाखपर्यंत पोहोचणार आहे. तर, पुढच्या दहाव्या आणि अकराव्या वर्षी ही संख्या ११.६ लाख एवढी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – काय आहे अग्निपथ योजना?

सैन्यात सरासरी वय 32 वर्षे आहे. परंतु अग्निवीरांच्या भरतीनंतर 6-7 वर्षांनी हे सरासरी वय 24-26 वर्षांपर्यंत करण्यात येणार आहे.

या योजनेमुळे सैन्यात भरती झाल्यानंतर अनेक तरुणांचा उत्साह कमी होण्याची शक्यता असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. कारण इथे फक्त चार वर्षांसाठीच भरती केली जात आहे. यामुळे देशात बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, बीएस राजू यांनी या दाव्याचं समर्थन केलेलं नाही.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -