घरताज्या घडामोडीCovid-19 India Update: लहान मुलांवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम होणार नाही, AIIMSच्या...

Covid-19 India Update: लहान मुलांवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम होणार नाही, AIIMSच्या डॉ. रणदीप गुलेरियांचे स्पष्टीकरण

Subscribe

देशात कोरोनाच्या दुसरी लाट थैमान घालत आहे. यादरम्यान लहान मुलं कोरोनाची शिकार अधिक होताना दिसत आहेत. पण आता कोरोनाची दुसरी लाट असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक लहान मुलं कोरोनाबाधित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र आज झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये एम्स संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम अधिक होणार नाही असे सांगितले आहे.

नेमके काय म्हणाले डॉ. रणदीप गुलेरिया?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक जास्त संसर्ग होईल असे म्हटले जात आहे. पण बालरोगशास्त्र असोसिएनने हे तथ्यावर आधारित नसल्याचे सांगितले आहे. तसेच याचा परिणाम मुलांवर होणार नाही त्यामुळे लोकांनी घाबरू नये, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

पुढे डॉ. गुलेरिया म्हणाले की, कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिस, कॅन्डिडा, एस्पोरोजेनस याचा संसर्ग होत आहे. या बुरशी मुख्य म्हणजे डोळ्यांच्या जवळच्या हाडांमध्ये, नाकात आढळतात आणि मेंदूत प्रवेश करू शकतात. कधीकधी फुफ्फुसांमध्ये जाऊ शकतात. बुरशीचे वेगवेगळे रंग पाहिले जाऊ शकतात.

- Advertisement -

म्युकरमायकोसिस हा बुरशी संसर्ग आहे आणि तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणारा आजार नाही. म्युकरमायकोसिसची लागण झालेले ९०-९५% रुग्ण एकतर मधुमेही असल्याचे आणि/किंवा स्टेरॉईड घेणारे आढळले आहेत, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – black fungus स्पर्शाने पसरत नाही, विविध रंगात वर्गीकरण करणे चुकीचे- आरोग्य मंत्रालय


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -