घरदेश-विदेशभारताच्या वाहतूक कोंडीत अडकला 'थॉर'

भारताच्या वाहतूक कोंडीत अडकला ‘थॉर’

Subscribe

हॉलिवूडचा थॉर म्हणजेच अभिनेता क्रिस हेम्सवर्थ या सध्या शुटिंगसाठी भारतात आला आहे. क्रिस भारतात शुटिंगसाठी आला असला तरी एका वेगळ्या कारणाने तो चर्चेत आला आहे.

रुपेरी पडद्यावर लाखोंना आपल्या हातोड्याने धूळीत मिळवणारा सुपरहिरो ‘थॉर’ म्हणजेच हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थ हा भारतात शुटिंगसाठी आला आहे. मात्र भारतात आल्यावर शुटिंग ऐवजी वेगळ्याच कारणाने तो चर्चेत आला. क्रिस भारतात वाहतूक कोंडीत अडकला होता. दरम्यान गाडीतून त्याने एक व्हिडिओ काढला होता. भारतातील वाहतूक कोंडी सुंदर असल्याचे त्याने या व्हिडिओत म्हटलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. क्रिस आपल्या आगामी नेटफ्लिक्स सीजनच्या शुटिंगसाठी अहमदाबाद येथे आहे. भारतात शुटिंगदरम्यान काढलेले फोटो त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले आहेत. क्रिस हेम्सवर्थ एक जगप्रसिद्ध अभिनेता आहे. हॉलिवूडमध्ये मार्वल कॉमिक्सच्या चित्रपटांमध्ये क्रिस याने थॉरची भूमिका केली होती.

- Advertisement -

सेल्फी झालेत वायरल

इतर देशांप्रमाणे क्रिस भारतातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे शुटिंगदरम्यान त्याला अनेक फॅन्सने त्याचा सोबत सेल्फी काढले. या वेळी क्रिसनेही आपल्या फॅन्सला नाराज केले नाही. लोकांसोबत उभाराहून क्रिसने अनेक फोटो काढले. त्याच्या भारतीय फॅन्स कडून त्याला खूप प्रेम मिळाले. यासाठी क्रिसने भारतीय फॅन्सचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -