माणूसकीला काळिमा! तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

गुजरात राज्यातील सुरत शहरामध्ये ही अमानुष घटना घडली आहे. बलात्कार करण्यात आलेल्या चिमुरडीचे वय अवघे तीन वर्षे इतके आहे.

गुजरातच्या सुरत शहरामध्ये माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शहराच्या हजीरा औद्योगिक भागात राहणाऱ्या अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी बलात्कार झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरामध्ये खळबळ माजली आहे. या घटनेमुळे देशातील मुली, महिलांचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था यावर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, या घटनेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा – अजमेरमध्ये तरुणीवर बलात्कार; पोलिस म्हणे भूतबाधा झाली!

काय आहे नेमकं प्रकरण?

गुजरातच्या सुरत शहरात एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर अज्ञात नराधमाने बलात्कार केला आहे. तिचे आई-वडिल मजूरीचे काम करतात. ही चिमुरडी गुरुवारी दुपारी ४ वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. चिमूरडीच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील चिमूरडी मिळत नव्हती. अखेर, त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांचा तक्रार दाखल केली आणि त्यानुसार मुलीचा शोध सुरु केला. दरम्यान, त्याचवेळी एका बाभळीच्या झाडांमध्ये एक चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत सापडली आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले. ही चिमुकली हरवलेली चिमुकलीच असल्याचे उघड झाले.

हेही वाचा – ३० वर्षीय महिलेवर कुर्ल्यात सामूहिक बलात्कार

नराधमांचा शोध सुरु

या तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिची प्रकृती गंभीर आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास लावत असून नराधमांचा शोध सुरु आहे. आरोपींचा छडा लावून त्यांना शिक्षा द्या, अशी मागणी सर्व स्तरावरुन केली जात आहे.


हेही वाचा – बलात्कार पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न