घरदेश-विदेशTime Magazine च्या Top 100 Influential Persons मध्ये गौतम अदानी, करुणा नंदी...

Time Magazine च्या Top 100 Influential Persons मध्ये गौतम अदानी, करुणा नंदी अन् खुर्रम परवेज यांचा समावेश

Subscribe

जगप्रसिद्ध टाईम मॅगझीनने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी (Times 100 Most Influential People) 2022 नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी, (Gautam Adani)  वकील करुणा नंदी आणि सामाजिक कार्यकर्ते खुर्रम परवेज (Khurram Parvez) यांच्या नावाचा समावेश आहे. या यादीत मिशेल ओबामा, एॅपलचे सीईओ टिम कुक यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन केविन मॅकार्थी, रॉन डेंसेंटिस, किर्स्टन सिनेमा, केतनजी ब्राउन या अमेरिकन राजकीय व्यक्तींचाही समावेश आहे.

टाईमने गौतम अदानीबद्दल लिहिले आहे की, एकेकाळी प्रादेशिक स्तरापासून सुरुवात केलेला अदानी आज विमानतळ, खाजगी बंदरे, सौर आणि औष्णिक ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यवसायात गुंतले आहेत. अदानी जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या देशातील एक आघाडीचे उद्योगपती आहेत, परंतु ते लोकांच्या नजरेपासून दूर राहत शांतपणे आपले व्यवसाय साम्राज्य वाढविण्यात मग्न आहेत. (Time’s 100 most influential people 2022 list)

- Advertisement -

नियतकालिकाने करुणा नंदीचे वर्णन महिला हक्कांच्या चॅम्पियन म्हणून केले आहे, ज्यांनी कोर्टाच्या आत आणि बाहेर आपला आवाज जोरदारपणे सादर केला आहे. तसेच, नंदी ही महिला हक्कांची पुरस्कर्ते असल्याचे सांगण्यात आले. ज्याने बलात्कार विरोधी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची वकिली केली आहे आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित खटले लढवले आहेत.

TIME ने 2022 मधील 100 सर्वात प्रभावशाली लोकांची यादीत युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा समावेश केला आहे. तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्साला वॉन डेर लेयन, टेनिसपटू राफेल नदाल आणि मीडिया दिग्गज ओप्रा विन्फ्रे यांचा समावेश आहे.

- Advertisement -

टाइममध्ये मनोरंजन क्षेत्रातील या लोकांचा समावेश

याशिवाय टाईम मासिकाने 100 प्रभावशाली लोकांमध्ये मनोरंजन क्षेत्राशी संबंधित चॅनिंग टॅटम, पीट डेव्हिडसन, अमांडा सेफ्राइड, झेंडाया, एडेल, सिमू लियू, मिला कुनिस, ओप्रा विन्फ्रे, अहमीर क्वेस्टलोव्ह थाम्पसन, मॅरी जे ब्लिज, मिरांडा लॅम्बर्ट, जॉन बॅटिस्ट आणि किनू रिव्स यांचा समावेश केला आहे. याशिवाय खेळाडूंमध्ये नॅथन चेन, अॅलेक्स मॉर्गन, एलीन गु, कँडेस पार्कर, अॅलेक्स मॉर्गन, मेगन रॅपिनो आणि बेकी सारब्रुन आणि राफेल नदाल यांचा समावेश आहे.


दारू, ड्रग्सनंतर हेडफोन्सवर गाणी ऐकत केली जातेय नशा, हे Digital Drugs नेमकं आहे तरी काय?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -