योगींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणे पडले महागात; 15 दिवस स्वच्छ करावी लागली गोशाळा

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Cm Yogi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट (Objectionable Post) शेअर करणे एका 15 वर्षीय मुलाला चांगलेच महागात पडले आहे.

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Cm Yogi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट (Objectionable Post) शेअर करणे एका 15 वर्षीय मुलाला चांगलेच महागात पडले आहे. या मुलाचे नाव अस्पष्ट असून, प्रशासनाने त्याला 15 दिवसांसाठी गोशाळा स्वच्छ करण्याची शिक्षा (Gaushala Cleaning Punishment) सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बदायू येथे राहणाऱ्या या 15 वर्षीय मुलाने योगींविरोधात सोशल मीडियावर (Social Media) छेडछाड केलेला फोटो शेअर करत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. त्यानंतर या मुलाचा शोध घेत त्याच्यावर याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर बाल न्याय मंडळाने या मुलाला शिक्षा सुनावली. या मुलाला 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, 15 दिवसांसाठी गोशाळा स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली आहे.

याप्रकरणी, 15 वर्षाच्या मुलाविरोधात या महिन्याच्या सुरुवातीला कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले. त्याचे वय लक्षात घेता ही शिक्षा सुनावण्यात आली आल्याची माहिती सरकारी वकील अतुल सिंह यांनी दिली.


हेही वाचा – ओबीसी आरक्षण घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात