घरदेश-विदेशअजबच, 23 वर्षांच्या 'तो मी नव्हेच'च्या नाट्यानंतर 'त्याने' केला गुन्हा कबूल

अजबच, 23 वर्षांच्या ‘तो मी नव्हेच’च्या नाट्यानंतर ‘त्याने’ केला गुन्हा कबूल

Subscribe

भारतात विविध प्रकरणात कोर्टाच्या पायऱ्या झिजवणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण यातील काही क्वचितचं प्रकरणं समोर येतात, जेव्हा आरोपीने उचलले पाऊल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण होते. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अशीच एक अजब घटना घडली. ज्यात 23 वर्षे जुन्या अशाच एका प्रकरणात आरोपीने तो मी नव्हेच म्हणत कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या, मात्र नाट्यानंतर कंटाळून त्याने अखेर कोर्टासमोर गुन्हा कबूल केला.

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यास त्याला शिक्षा होऊ शकते असे न्यायालयाने सांगितले तरीही आरोपी मागे हटला नाही. यावेळी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अखिलेश्वर प्रसाद मिश्रा यांनी नरमाईची भूमिका घेत दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपीला चार महिने कारावास आणि 2900 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या प्रकरणात 23 वर्षांपासून पोलीस एकाही साक्षीदाराला न्यायालयात हजर करु शकले नाही.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

1999 मध्ये चाकेरी येथील दीपक गेस्ट हाऊसजवळ झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थानिक लोक हिंसक झाले आणि त्यांनी बसेसची तोडफोड जाळपोळ केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते. 2008 मध्ये कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरु झाली.

या घटनेबाबत सहाय्यक जिल्हा सरकारी अधिवक्ता विनोद त्रिपाठी यानी सांगतले की, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी म्हणून विजय दास, (रा. सुभाष रोड, चाकेरी) याला पोलीस कोठडी सुनावली. दंगल, सरकारी मालमत्तेचे नुकसान अशा अनेक कलमांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सातत्याने समन्स, अटक वॉरंट पाठवूनही पोलिसांनी एकाही साक्षीदाराला न्यायालयात हजर केले नाही, त्यानंतर विजयने कबुली जबाब देण्यासाठी अर्ज केला.

- Advertisement -

या अर्जात विजय याने लिहिले की, तो एक मजूर आहे. मात्र या केसमुळे त्याला बाहेर कामावरही जाता येत नाही. ज्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात अडचण येत आहेत. प्रत्येक तारखेला पैसे खर्च होतात आणि वेळ वाया जातो. यामुळे कंटाळलो असून माझा गुन्हा मी कबूल करू इच्छितो.

त्यानंतर न्यायालयाने त्याचा अर्ज स्वीकारून सत्र खटला क्रमांक 401/2008 मध्ये एक महिना कैद आणि 2500 रुपये दंड ठोठावला, तर दुसऱ्या सत्र खटल्यात 172/2008 मध्ये चार वेगवेगळ्या कलमांत एकूण 2400 रुपये दंड ठोठावला. ही शिक्षा तुरुंगात घालवलेल्या कालावधीनुसार समायोजित केली जाईल. सहाय्यक जिल्हा सरकारी वकिलांनी सांगितले की, विजय हा दीड महिन्यांपासून तुरुंगात आहे.


कर्नाटकमध्ये तीन वाहनांच्या जोरदार धडकेत 9 जणांनी गमावला जीव

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -