घरCORONA UPDATEकोरोनाच्या योद्ध्यांसाठी एअर फोर्स करणार फ्लाय पास्ट, हेलिकॉप्टरमधून करणार फुलांचा वर्षाव

कोरोनाच्या योद्ध्यांसाठी एअर फोर्स करणार फ्लाय पास्ट, हेलिकॉप्टरमधून करणार फुलांचा वर्षाव

Subscribe

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बीपिन रावत यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्या देशातील कोरोनाच्या योद्ध्यांसाठी ३ मे रोजी तिनही सैन्य दल कृतज्ञता व्यक्त करणार आहे. कोरोनाच्या या योद्ध्यांमध्ये डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांचा समावेश होतो. इंडियन एअर फोर्सकडून फ्लाय पास्ट करण्यात येणार आहे. तर भारतीय नौदल जहाजांवर विशेष रोषणाई करणार आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बीपिन रावत यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

पत्रकार परिषदेला सीडीएस बीपिन रावत यांच्यासोबत तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. “प्रत्येक कोरोना वॉरिअर आणि आमच्या देशातील सर्व नागरिकांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. ३ मे रोजी तिन्ही सैन्यदलांकडून विशेष कवायती सादर केल्या जातील,” अशी माहिती सीडीएस रावत यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – रेड झोन म्हणजे काय? लॉकडाऊनमधील निर्बंध काय आहेत?


ज्यावेळी देशाचा विषय असतो तेव्हा आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. हे आपल्या देशात प्रत्येकाला समजतं, असं रावत म्हणाले. कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्स काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरात कच्छपर्यंत फ्लाय पास्ट करणार आहे. हेलिकॉप्टरमधून रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करण्यात येणार असून वैद्यकीय इमारतींबाहेर लष्कराचा विशेष बॅण्ड वाजवला जाणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -