घरदेश-विदेशCorona : आधुनिक निरो; लाखभर मृत्यूनंतरही ट्रम्प गोल्फ खेळण्यात मग्न!

Corona : आधुनिक निरो; लाखभर मृत्यूनंतरही ट्रम्प गोल्फ खेळण्यात मग्न!

Subscribe

यापूर्वीही गोल्फमुळे ट्रम्प सापडले होते वादात

इटलीची राजधानी रोम जळत होती तेव्हा निरो गिटार वाजवत होता, तर तसाच काहीसा प्रकार आता अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे बघायला मिळाला. अमेरिका या देशात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून १६ लाख ६७ हजार २५२ कोरोना बाधितांचा एकूण आकडा असून आतापर्यंत ९८ हजार ६८७ रूग्णांचा कोरोनाने बळी गेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळण्यात मग्न असल्याचे बघायला मिळत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ७५ दिवसांनंतर गोल्फ खेळण्यास व्हर्जिनियामधील गोल्फ कोर्समध्ये गोल्फ खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले असून सिक्रेट सर्व्हिसचे एजंटही त्यांच्यासह उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासह उपस्थित असणाऱ्यांनी मास्क घातले होते मात्र ट्रम्प मास्कविना गोल्फ खेळताना बघायला मिळाले.

- Advertisement -
यापूर्वीही गोल्फमुळे ट्रम्प सापडले होते वादात

ट्रम्प त्यांच्या गोल्फ खेळण्याच्या छंदावरून यापुर्वी देखील वादात सापडले होते. २०१६ च्या निवडणूक प्रचारादरम्यान ते म्हणाले की, मी तुमच्यासाठी काम करणार आहे. त्यानंतर मला गोल्फ खेळायलाही वेळ मिळणार नाही. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ट्रम्प कित्येकदा गोल्फ खेळताना दिसले. त्यांनी शेवटचा गोल्फ ८ मार्च रोजी खेळला होता. त्यावेळी अमेरिकेत कोरोना संसर्गाची गती वाढत होती. २०१४ मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना ट्रम्प यांनी त्यांच्या गोल्फ खेळल्याबद्दल अनेकदा टीका केली होती.

कोरोनाचा वाढता संसर्ग असूनही अमेरिकेतील अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी योजना लवकरच तयार केल्या जात आहेत. आरोग्य तज्ज्ञ निर्बंध उठविण्याच्या धोक्याविषयी इशाराही देत आहेत. या सर्व प्रकारामुळे ट्रम्प प्रशासन दुर्लक्ष करताना दिसतंय. उन्हाळ्याच्या हंगामाच्या सुरूवातीस लोकांना मेमोरियल डे साजरा करण्यास सांगितले जात आहे. शुक्रवारी कोरोना टास्कफोर्सचे सदस्य डॉ. डेबोरा बर्क यांनी सांगितले की, वॉशिंग्टन डीसी, मेरीलँड आणि व्हर्जिनियामध्ये या कोरोना व्हायरसचा धोका कायम असूनही लोकांना गोल्फसारख्या उपक्रमांसाठी प्रेरित केले जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -