चीनने जे केलं ते कधीचं विसरणार नाही अमेरिका – ट्रम्प

Trump Calls COVID-19 As 'Artificial Horrible Situation', Says US Will Never Forget What China Did
चीनने जे केलं ते कधीचं विसरणार नाही अमेरिका - ट्रम्प

संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. दरम्यान अमेरिकेना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे सुरुवातीपासूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर टीका करताना दिसत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान पुन्हा एकदा ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधला आहे. जगात कोरोनाचा फैलाव केल्यामुळे ट्रम्प यांनी चीनवर टीका केली आहे.

डोनाल्ड्र ट्रम्प काय म्हणाले?

‘चीनमुळे जे काही सुरू आहे याचा कधीच कोणीच विचार केला नव्हता. कोरोनाचा येण्यापूर्वी आपण त्यांच्यापेक्षा उत्तम कामगिरी करत होता. कोरोनामुळे जवळपास २० लाख नागरिक मृत्यूमुखी पडण्याची भीती होती. पण आपण हळूहळू कोरोनातून बाहेत येत आहोत. कोरोनाच्या काळात आपण योग्य निर्णय घेतल्यामुळे मृत्यू होण्याची संख्या २ लाख आहे. पण आपण कोणाचाही मृत्यू होऊ नको द्यायला होता. चीनने जे आपल्यासोबत केले आहे ते कधीच विसणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

तसेच कोरोनामुळे सध्या निर्माण झालेली परिस्थितीत भयंकर आणि कृत्रिम असल्याचे ट्रम्प म्हणाले. ‘कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वी अमेरिका सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. तसेच आपण सर्वजण एकत्रित येत होतो आणि यासाठी यश हा महत्त्वाचा मार्ग होता. जोपर्यंत ही कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती कृत्रिम आणि भयंकर नव्हती तोवर हे होतही होते, असे ट्रम्प म्हणाले


हेही वाचा – Live Update: जगभरातील २ लाख ९६ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!