घरदेश-विदेशअमेरिकेचा ड्रोन हल्ला, तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या ठार

अमेरिकेचा ड्रोन हल्ला, तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या ठार

Subscribe

अमेरिकेने पाकिस्तान-अफगणिस्तान सीमारेषेवरच्या कुनार या ठिकाणी केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबानचा (टीटीपी ) म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाह ठार झाला आहे. व्हाईस ऑफ अमेरिका या न्युज एजन्सीने मुल्ला फजल उल्‍लाह ठार झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान-अफगणिस्तान सीमारेषेवर मुल्ला फजल उल्‍लाह आपल्या सहकाऱ्यांसोबत येणार असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली. त्यानंतर ड्रोन हल्ला करत अमेरिकेने मुल्ला फजल उल्‍लाहला ठार केले.१३ जुनला ही कारवाई केली होती.

अमेरिकेने पाकिस्तान-अफगणिस्तान सीमारेषेवरच्या कुनार या ठिकाणी केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबानचा (टीटीपी ) म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाह ठार झाला आहे. व्हाईस ऑफ अमेरिका या न्युज एजन्सीने मुल्ला फजल उल्‍लाह ठार झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. १३ जुनला अमेरिकेने ड्रोन हल्ला केला होता. पण, हल्ला यशस्वी झाला का? या प्रश्नावर कोणतेही उत्तर अमेरिकेने दिले नव्हते. अखेर व्हाईस ऑफ अमेरिका या न्युज एजन्सीने मुल्ला फजल उल्‍लाह अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तान-अफगणिस्तान सीमारेषेवर मुल्ला फजल उल्‍लाह आपल्या सहकाऱ्यांसोबत येणार असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली. त्यानंतर ड्रोन हल्ला करत अमेरिकेने मुल्ला फजल उल्‍लाहला ठार केले.

कोण होता कुख्यात मुल्ला फजल उल्‍लाह?

मुल्ला फजल उल्‍लाह हा तहरीक – ए – पाकिस्तान (टीटीपी ) या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता. डिसेंबर २०१४मध्ये पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवाही हल्ल्याचा मास्टर माईंड म्हणून मुल्ला फजल उल्‍लाहची ओळख आहे. शाळेवर झालेल्या हल्ल्यात १५१ जणांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये १३० मुलांचा देखील समावेश होता. शाळेवरच्या या हल्ल्याने जगभरात हळहळ व्यक्त केली गेली होती. शिवाय पाकिस्तानमध्ये मुलींच्या शैक्षणिक हक्कासाठी लढणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार विजेती मलाल युसूफझाई हिच्या हत्येचा आदेश देखील मुल्ला फजल उल्‍लाहने २०१२ साली दिला होता.

- Advertisement -

मुल्ला फजल उल्‍लाहवर अमेरिकेचे इनाम

मुल्ला फजल उल्‍लाहच्या दहशतवादी कारवाया पाहिल्यानंतर त्याच्या कुख्यातपणाचा अंदाज येतो. मुल्ला फजल उल्‍लाह वर अमेरिकेने ५ कोटी रूपयांचे इनाम घोषित केले होते. अमेरिकेने मार्चमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात मुल्ला फजल उल्‍लाहचा मुलगा ठार झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -