कोरोना वुहानच्या प्रयोगशाळेत तयार झाल्याचा दावा करणाऱ्या महिलेचे ट्विटर अकाऊंट बंद

Twitter suspends account of Chinese virologist who said Covid-19 virus was made in Wuhan laboratory
कोरोना वुहानच्या प्रयोगशाळेत तयार झाल्याचा दावा करणाऱ्या महिलेचे ट्विटर अकाऊंट बंद

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगात ३ कोटींहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी ९ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यानच जगभरात पसरणारा कोरोना व्हायरस हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित असून तो वुहानच्या प्रयोगशाळेत विकसित झाल्याचा दावा चीनच्या महिला वैज्ञानिक ली मेंग यान यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तेव्हापासून त्या खूप चर्चेत आल्या आहेत. पण ट्विटरने चीन महिला वैज्ञानिक ली मेंग यान यांचे ट्विटर अकाऊंड स्पेंपड म्हणजेच बंद केले आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, चीनवर आरोप केल्यानंतर ली मेंग यान याचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले. यान यांचे सर्व ट्विट्स काढून टाकण्यात आले आहेत. माहितीनुसार, ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर ट्विटर अकाऊंट बंद करते. यान यांचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे.

ट्विटवर मायक्रोब्लॉगिंग साईटने कोरोना संदर्भात वादग्रस्त विधान करण्याऱ्यासाठी इशारा दिला होता. पण यानकडून ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारे एखादे विशिष्ट ट्विट होते का? हे स्पष्ट झालेले नाही आहे.

यान यांनी दावा केल्यानंतर चीन सरकारकडून धमक्या येत असल्यामुळे त्या सध्या अमेरिकेत राहत आहेत. त्यांच्या दाव्यामुळे एकच खळबळ सर्वत्र उडाली आहे. कोरोना व्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरला आहे. विशेष म्हणजे या व्हायरसची जीनोमची अंतर्गत रचना हाताच्या बोटांच्या ठशासारखी आहे. याच आधारावर आपण हा व्यवसाय मानवनिर्मित असल्याचे सिद्ध करणार असल्याचे यान यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे कोणत्याही व्हायरसची फिंगरप्रिंटसारखी रचना असते, हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे असल्याचे यान यांनी सांगितले.

या व्हायरसबाबत यान यांना माहिती मिळाल्याचे कळताच चीन सरकारकडून त्यांना धमकवण्यात आले. त्यामुळे त्या हॉंगकॉंग सोडून अमेरिकेत गेल्या. त्यानंतर त्यांनी जमवलेली सर्व माहिती आणि डेटाबेस चीन सरकारने नष्ट केला. तसेच आपल्या सहकाऱ्यांना त्याच्याबाबत अफवा पसरवण्यास सांगण्यात आले, असा आरोपही यान यांनी केला आहे.

चीनकडून त्यांना खोटे ठरवण्यासाठी अनेकप्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच यान यांच्यावर हत्या केल्याचे आरोपही ठेवण्यात येत आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत त्या मागे हटणार नाहीत. तसेच कोरोना व्हायरसचा अभ्यास करणाऱ्या सुरुवातीच्या काही पथकांमध्ये त्यांनी काम केले असल्याचेही यान यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्याला महत्त्व आले आहे.