घरदेश-विदेशHyderabad Stray Dogs : हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अडीच वर्षीय मुलीचा मृत्यू

Hyderabad Stray Dogs : हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अडीच वर्षीय मुलीचा मृत्यू

Subscribe

हैदराबादच्या गायत्री नगरमध्ये एका बांधकामाधीन इमारतीबाहेर खेळत असताना अडीच वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. पीडित मुलीला कुत्र्यांपासून वाचवून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हैदराबाद : गायत्री नगरमध्ये एका बांधकामाधीन इमारतीबाहेर खेळत असताना अडीच वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. पीडित मुलीला कुत्र्यांपासून वाचवून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना 12 एप्रिल रोजी घडली. (Two and a half year old girl dies after being attacked by stray dogs in Hyderabad)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली (वय 2 वर्ष 6 महीने) असे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तिचे आई वडील हे मूळचे छत्तीसगड येथील रहिवासी असून ते रोजगारासाठी पाच महिन्यांपूर्वी हैदराबादला आले होते. गायत्री नगरमध्ये दीपालीचे आई-वडील बांधकामाधीन इमारतीमध्ये काम करत असताना तिथेच बाहेर पत्र्याच्या खोलीाबाहेर बहिणीसोबत खेळत असताना अडीच वर्षीय दिपालीवर दोन भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.

- Advertisement -

स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे दिपालीची मोठी बहीण सुखरूप बचावली, मात्र दिपालीला कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे गंभीर जखमी झाली. त्यामुळे तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दिपालीला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांमुळे येथील नागरिक दहशतीत आहेत. नागरीकांनी त्यांच्या तक्रारी पोलिसांना आणि पालिका अधिकाऱ्यांकडे पाठवल्या आहेत. मात्र पालिका अधिकारी आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच लहान मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्येही 4 वर्षीय मुलीचा मृत्यू (4 year old girl died in Uttar Pradesh)

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका 4 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, शंकर नावाचा व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमेठी माता मंदिराजवळ एका तात्पुरत्या झोपडीत कुटुंबासह राहत होता. त्याचे कुटुंबीय सकाळी भीक मागण्यासाठी बाहेर पडले असता भटक्या कुत्र्यांनी त्यांना घेरले आणि त्यांच्यामागे येणाऱ्या त्यांच्या 4 वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. लोकांनी कुत्र्यांना पळवून लावले, मात्र तोपर्यंत कुत्र्यांनी मुलीला गंभीर जखमी केले होते, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -