घरदेश-विदेशचक्क दोन अल्पवयीन मुलांनी पळवले विमान

चक्क दोन अल्पवयीन मुलांनी पळवले विमान

Subscribe

अमेरिकेच्या उटाह शहरात विमान चोरीला गेले आहे. विशेष म्हणजे हे विमान चोरी करणारे दोन अल्पवयीन मुले आहेत, अशी माहिती समोर येताना दिसत आहे.

आतापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी गाड्या चोरीला गेल्याच्या घटना आपण एकल्या असतील. मात्र, विमान चोरल्याची घटना अजूनही तुमच्या कधी कानी पडली नसेल. आता मात्र ही अशी घटना खरच घडली आहे. अमेरिकेच्या उटाह शहरात विमान चोरीला गेले आहे. विशेष म्हणजे हे विमान चोरी करणारे दोन अल्पवयीन मुले आहेत, अशी माहिती समोर येताना दिसत आहे. या घटनेविषयी संपूर्ण माहिती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. एवढ्या लहान वयात मुलांनी विमान चालवले कसे? असा प्रश्न लोकांना पडत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गेम खेळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेतील कंप्युटर्सचीच केली चोरी

काय आहे नेमकं प्रकरण?

अमेरिकेच्या उटाह शहरात १४ आणि १५ वर्षाचे दोन तरुणांनी विमान पळवले आहे. हे विमान प्रवासी विमान नव्हते. ते एक छोटे सिंगल इंजिन असलेले एअरक्राफ्ट आहे. हे विमान वर्नल एअरपोर्टवर लॅंड केले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मुलं ट्रॅक्टरच्या दिशेने जात होते. परंतु, त्यांनी अचानक निर्णय बदलला आणि ते विमानात बसले आणि विमान सुरु करुन हवेत भरारी घेतली. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या मुलांनी विमान सुरु केले आणि आकाशात भरारी घेतली आणि बघता बघता ते विमान नजरेसमोरुन दूर झाले.

- Advertisement -

हेही वाचा – चोरीच्या गुन्ह्यांतील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -