घरदेश-विदेशउदयपूरमध्ये रेल्वे ट्रॅक उडवण्याचा कट; ग्रामस्थांमुळे टळला अनर्थ

उदयपूरमध्ये रेल्वे ट्रॅक उडवण्याचा कट; ग्रामस्थांमुळे टळला अनर्थ

Subscribe

राजस्थानमधील उदयपूरमध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेपूर्वी घातपाताचा एक मोठा कट फसला आहे. उदयपूरमध्ये रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न सुरु होता. यावेळी ग्रामस्थांनी बॉम्बस्फोटाचा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेत, वरिष्ठांना माहिती दिली आहे. यावेळी आरोपींनी रेल्वे ट्रॅकवरील अनेक नट – बोल्ट गायब केल्याचे आढळून आले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

उदयपूर सालुंबर मेघा महामार्गावरील ओडा पुलाजवळ रेल्वे ट्रॅकवर हा घातपाताचा प्रयत्न होता. यावेळी ट्रॅकवरील नट-बोल्टही गायब आढळले. ट्रॅकच्या मधोमध असलेली लोखंडी प्लेटही उखडलेली आढळून आली. याठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा त्यांना पुलाजवळील ट्रॅकवर स्फोटाचा आवाज आला. स्फोटाच्या 4 तास आधी येथून एक ट्रेन गेल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

सकाळी ग्रामस्थांच्या माहितीवरून रेल्वेचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यासोबतच उदयपूरचे विभागीय आयुक्त राजेंद्र भट्ट, जिल्हाधिकारी ताराचंद मीना आणि एसपी विकास कुमार शर्माही संधीची पाहणी करण्यासाठी पोहोचले. दरम्यान अहमदाबादहून उदयपूरला येणारी ट्रेन डुंगरपूर येथे थांबवण्यात आली आहे.

रेल्वे व्यवस्थापकाने सध्या या मार्गावर धावणाऱ्या दोन्ही गाड्या थांबवल्या आहेत. रेल्वे रुळावरील नट-बोल्ड आणि लोखंडी प्लेट गायब झाल्याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. शनिवारी रात्री ट्रॅकवरून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

उदयपूर अहमदाबाद ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी असरवा स्टेशनवरून हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली होती. या ट्रॅकसाठी तब्बल 16 वर्षे वाट पाहावी लागली होती.


इस्तंबूल बॉम्बस्फोटप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात, स्फोटात 6 जणांचा मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -