आला थंडीचा महिना! राज्यात हुडहुडी वाढली, तर ‘या’ भागात पावसाचा अंदाज

Winter in Maharashtra :Mahabhaleshwar looks like Kashmir

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होतोना दिसतेय. त्यामुळे राज्यात हुडहुडी वाढली आहे. पण एकीकडे थंडीची चाहूल लागलेली असताना पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील उत्तरेकडे थंडी तर, कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात १३.३ अंश सेल्सिअस नोंदवम्यात आले आहे. अनेक शहरांत किमान तापमानात घट झाली आहे. अनेक शहरांचं तापमान १७ अंशांखाली आलं असून यामध्ये नाशिक, महाबळेश्वरसह २६ शहारंचा समावेश आहे. उत्तर भारतात होत असलेल्या हवमान बदलांमुळे सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण राहाण्याची शक्यता आहे. हे वातावण कमी झाल्यास तापमानात किंचित घसरण होणार आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

कोणत्या शहरांत किती तापमान?

 • सोलापूर १७.७
 • उदगीर १५,
 • कोल्हापूर १७.८
 • मालेगाव १७.२
 • उस्मानाबाद १६.४
 • नाशिक १४.३
 • नांदेड १६.४
 • जळगाव १७
 • पुणे १३.३
 • जालना १६.२
 • औरंगाबाद १४.२
 • बारामती १३.९
 • महाबळेश्वर १३.४
 • परभणी १५.५
 • सांगली १६.९
 • अमरावती १७
 • बुलढाणा १७.४
 • चंद्रपूर १७.६
 • गडचिरोली १५.६
 • गोंदिया १६
 • वाशिम १७
 • यवतमाळ १५
 • मुंबई २३.२