घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआरक्षणात टक्का न वाढवता मराठयांना ओबीसीत घेऊ नये; छगन भुजबळांचे वक्तव्य

आरक्षणात टक्का न वाढवता मराठयांना ओबीसीत घेऊ नये; छगन भुजबळांचे वक्तव्य

Subscribe

नाशिक : मराठा समाजाला ओबीसीत घ्यायला काही हरकत नाही, मात्र यासाठी एक तर एकूण आरक्षणाची मर्यादा वाढवा किंवा ओबीसींचा टक्का वाढवून मराठा समाजाला ओबीसीत घ्या. आमची काही हरकत नाही. मात्र, टक्का न वाढवता मराठ्यांना ओबीसीत घेऊ नये. नाही तर दोन्ही समाजाचा काहीच फायदा होणार नाही असे वक्तव्य राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

नाशिक येथे बोलतांना भुजबळ म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण फक्त 17 टक्के उरलेले आहे. या 17 टक्क्यात 400 जाती असून यामुळे सगळ्यांची अडचण होईल. 50 टक्क्यांची कॅप ओलांडून दहा टक्के ओपनला वाढवलेले आहे. भारत सरकारने आणखी दहा टक्के वाढवून त्यात मराठा समाजासह पटेल, कापू, जाट यांना आरक्षण द्या, म्हणजे सगळ्यांचा प्रश्न मिटेल. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, 17 टक्क्यांमध्ये 54 टक्के ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही, यामुळे कोणाच्याच वाट्याला काही येणार नाही.

- Advertisement -

मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या सगळ्यांसह विरोधी पक्षाने देखील आपले मत मांडले पाहिजे. ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा न येता धक्का मराठा समाजाला कसा न्याय देता येईल हे बघितले पाहिजे. सगळ्यांनी जाऊन दिल्लीत बसले पाहिजे. हे सगळे सहज करता येणे शक्य आहे. नाहीतर या सगळ्या लढाया सुरुच राहणार आहेत, मोर्चे निघणार आंदोलन होणार, परत तोंडाला पाने पुसली जाणार आहेत.

हेही वाचा : ‘नाशिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद; बाजारपेठेवर परिणाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -