घरताज्या घडामोडीUK मध्ये Self Isolation सक्ती हटणार, सरकार नियमात बदल करण्याच्या तयारीत

UK मध्ये Self Isolation सक्ती हटणार, सरकार नियमात बदल करण्याच्या तयारीत

Subscribe

युनायटेड किंगडम (UK) कडून कोरोना (Covid-19)ची लागण झाल्यावर सेल्फ आयसोलेट (Self-Isolate) करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल करण्याचे संकेत मिळत आहेत. नव्या धोरणाअंतर्गत कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर कायदेशीर पद्धतीने लोकांना सेल्फ आयसोलेट करण्याची गरज नसेल, असे वृत्त द टेलिग्राफने दिले आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोना संसर्गाच्या निमित्ताने असणारी एमर्जन्सी कायम स्वरूपी हटवण्याची गरज वाटते आहे. कारण ब्रिटनमध्ये covid-19 च्या रूग्णसंख्येत सातत्याने उतार पहायला मिळत आहे. त्यामुळेच सेल्फ आयसोलेशनच्या बाबतीत कोणताही दंड किंवा कायदेशीर कारवाई करण्यापासून नागरिकांना सूट देण्याच्या विचारात ब्रिटन सध्या आहे.

- Advertisement -

जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर सेल्फ आयसोलेशनबाबत येत्या आठवड्यांमध्ये कायदेशीर बाबींमध्ये बदल करत घोषणा करण्याच्या मानसिकतेत ब्रिटनमधील प्रशासन आहे. गेल्याच आठवड्यात आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी स्पष्ट केले आहे की, एखाद्याची कोरोना चाचणी ही दोनवेळा निगेटिव्ह आल्यास, त्या व्यक्तीचा covid-19 सेल्फ आयसोलेशन कालावधी हा सात दिवसांवरून पाच दिवसांवर करण्याचा मानस आहे.

बोरीस जॉन्सन हे प्लॅन बी अंतर्गत covid-19 निर्बंध हटवण्याच्या बाबतीत आणखीही विचार करत असल्याची माहिती टेलिग्राफने दिली आहे. ओमिक्रॉनचा मंदावलेला संसर्ग पाहूनच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे कळते.

- Advertisement -

बोरिस जॉन्सन कॉन्ट्रोवर्सी

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे सध्या २०२० च्या कोविड लॉकडाऊनमधील एका पार्टीच्या वादात अडकले आहेत. या प्रकरणात त्यांनी माफी मागितली आहे. पण हा वाद काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही, अशीच परिस्थिती सध्या आहे. काही गोष्टी या सरकारी पातळीवर त्यांच्या सरकारने व्यवस्थित केल्या नाहीत, ही कबुली खुद्द जॉन्सन यांनी दिली आहे. बोरिस जॉन्सन यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बोरिस जॉन्सन एका महिलेसोबत हातात ग्लास घेऊन डान्स करताना दिसत आहेत. या प्रकरणावरूनच बोरिस जॉन्सन अडचणीत आले आहेत. त्यांच्यासोबत डान्स करणारी महिला ही तत्कालीन अध्यक्ष असल्याचे बोलले जात आहे. पण याबाबतची अधिकृत पडताळणी करण्यात आलेली नाही. तसेच हा व्हिडिओ कधी काढण्यात आला आहे, याबाबतची माहितीही समोर आलेली नाही.

कोरोना नियमांचे केले होते उल्लंघन

बोरिस जॉन्सन हे आपली पत्नी कॅरीसोबत एका पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीत त्यांनी कोविड १९ नियमांचे उल्लंघन केले होते. पार्टीसाठी १०० लोकांना ईमेल पाठवून निमंत्रित केले होते. जॉन्सन यांचे प्रधान सचिव मार्टिन रेनॉल्ड्स यांच्या वतीने ईमेल पाठविण्यात आला होता. त्यावेळी देशात फक्त आपल्या घरातच पार्टीचे आयोजन करण्यासाठी परवानगी होती. तसेच दुसऱ्या घरातील एकाच व्यक्तीला भेटण्यासाठीची परवानगी देण्यात आली होती. पण नियमांचे उल्लंघन करत पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे समोर आले होते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -