घरदेश-विदेश'हे' इटालियन गाव आलं २६ वर्षांनंतर पाण्यातून बाहेर!

‘हे’ इटालियन गाव आलं २६ वर्षांनंतर पाण्यातून बाहेर!

Subscribe

जाणून घ्या, या गावाबद्दल....

इटलीमधील एक गाव तब्बल २६ वर्षानंतर बाहेर आले आहे. आता इटालियन सरकार या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस, मध्ययुगीन ऐतिहासिक हे गाव पाहण्यासाठी पर्यटकांना खुलं करणार आहे. हे गाव गेल्या ७३ वर्षांपासून तलावात बुडले होते. काही लोक म्हणतात की, या गावात भूत आणि प्रेतं होती, म्हणून या गावाला पाण्यात बुडवण्यात आले होते. चला या गावाबद्दल जाणून घेऊया …

असे आहे हे इटालियन गाव

फॅब्रिश डी कॅरीन (Fabbriche di Careggine) असे या गावचे नाव असून हे गाव १९४७ पासून वागली तलावातील (Lake Vagli) पाण्यात बुडलेले आहे. ७३ वर्षांपासून पाण्यात बुडलेलं हे गाव आतापर्यंत फक्त चार वेळा दिसलं असून फक्त १९५८, १९७४, १९८३ आणि १९९४ मध्ये पर्यटक याठिकाणी फिरायला आल्याचे सांगण्यात येत आहे.
आता २६ वर्षांनंतर या तलावाचे पाणी पुन्हा कमी होत असून हे गाव बाहेर येत आहे. फॅब्रिश डी कॅरीन हे गावं १३ व्या शतकात वसलेले होते, असे म्हटले जाते. या गावातून लोहाची निर्मिती झाल्याने येथे लोखंडाचे कामकाज करणारे लोहार मजूर राहतात, असे सांगितले जाते.

- Advertisement -

इटलीमधील लुक्का प्रांतातील टसकॅनी शहरात असलेले हे गाव पाहण्याची संधी २६ वर्षानंतर परत येत आहे. वागली तलाव रिकामा होईल, तेव्हाच पर्यटकांना हे गाव पाहण्याची संधी येते. हे गाव नेहमीच ३४ दशलक्ष घनमीटर पाण्यात बुडलेले असते.

- Advertisement -

१९४७ मध्ये या गावात धरण बांधले गेले. असे म्हटले जाते की, येथे भुतं प्रेतं होती म्हणून ते गाव पाण्यात बुडवण्यात आले होते. आता धरण चालवणाऱ्या कंपनीने सांगितले की, आम्ही हळूहळू तलावाचे पाणी खाली करीत आहोत. जेणेकरून थोडी स्वच्छता करता येईल. हे काम पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल. येथे १९४७ मध्ये जलविद्युत धरण बांधले गेले तेव्हा इथले रहिवासी जवळच्या वागली दे सोटो या गावी पुर्नस्थापित करण्यात आले आहे. जेव्हा फॅब्रिश डी कॅरीन गाव पाण्यातून बाहेर येईल, तेव्हा १३ व्या शतकातील दगडांनी बनविलेल्या इमारतीही लोकांना दिसतील.

 

या गावात आजही चर्च, स्मशानभूमी आणि दगडी घरे दिसतात. वागली दि सोटोचे माजी नगराध्यक्ष म्हणाले की, पाणी कमी होताच लोक ते पाहण्यासाठी येतील. जेव्हा तलाव रिकामा असतो तेव्हा पर्यटक या गावात फिरू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -